जिल्ह्याला गेल्या अडीच वर्षांपासून अर्धवेळ असलेले पालकमंत्रिपद या वेळी फुलटाइम ठाणेदाराला देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ठाण्यात पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण तसेच किसन कथोरे यांची नावे चर्चेत आहेत.
त्यापैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यातच ठाणे जिल्ह्याला पुढचा पालकमंत्री हा ‘ठाणेदार’च असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.