BMC थेट रेड्डीजकडून लस का घेत नाही? मधले दलाल कशासाठी - मनसे

संदीप देशपांडेंनी काय प्रश्न विचारलाय?
sandeep 1.jpg
sandeep 1.jpg
Updated on

मुंबई: मुंबईत वेगाने लसीकरण करता यावे, यासाठी मुंबई महापालिकेने लस खरेदीसाठी (bmc vaccine procurment) निविदा काढल्या आहेत. सुरुवातीला या निविदांना प्रतिसाद मिळाला नव्हता. पण नंतर काही कंपन्या लस पुरवठ्यासाठी तयार झाल्या, त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी निविदांना मुदतवाढ देण्यात आली. दुसऱ्या लाटेचा फटका झेलणाऱ्या मुंबईला तिसऱ्या लाटेचा (Mumbai third wave) फटका बसू नये, यासाठी लस खरेदीला महापालिकेने प्राधान्य दिले आहे. पण महापालिकेच्या या निर्णयांवर विरोधी पक्षात असलेल्या भाजपा, मनसेकडून जोरदार टीका होत आहे. (Why bmc is not direct purchasing vaccine from dr. reddy lab mns sandeep deshpande questions)

आता मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी लस खरेदीवरुन एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. "मुंबई महानगर पालिकेने ग्लोबल टेंडर काढले. ८ ते ९ कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. हे कंत्राटदार डाँक्टर रेड्डीज लँबकडून लस खरेदीकरून पालिकेला देणार. मग पालिका थेट रेड्डीजकडून लस का घेत नाही?. मधले दलाल कशासाठी?" असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

sandeep 1.jpg
नात्याला कलंक! वडिलांनीच पोटच्या मुलीवर केला बलात्कार

"ग्लोबल टेंडर मध्ये मधले दलाल का ? निवडले जात आहेत. थेट पालिका का नाही डाँक्टर रेड्डीजकडून लस घेत. कुठे तरी पाणी मुरतयं. पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने कुठेतरी इगो बाजूला ठेवायला हवा. नुसती लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाचा सपाटा लावत दुसऱ्याच्या कामाचं क्रेडिट घेण्याचं काम शिवसेनेनं सोडावं" असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

sandeep 1.jpg
मुंबईकरांनो आज लसीकरणाला उतरण्याआधी 'ही' बातमी वाचा

ऑगस्ट महिन्यात कोविडची तिसरी लाट येणार आहे. या लाटेचा प्रभाव कमी करायचा असल्यास किमान 60 लाख नागरिकांना ऑगस्टमध्ये लशींचे डोस मिळणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यानुसार, पुढील 80 दिवसात मुंबईतील 53 लाखाच्या आसपास नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.