मुंबई - देशात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतानाच दिसतोय. सोमवारपासून म्हणजेच 4 मे रोजीपासून देशात तिसऱ्या लॉकडाऊनची सुरुवात झाली. देशात गेल्या 40 दिवसांपासून लॉकडाऊन आहे. केंद्र सरकारनं कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली. पण देशात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. केंद्र सरकारही वेगवेगळ्या पातळीवर कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देशातल्या कोरोनाबाधितांचा आकडा पाहिला तर तो आता 42 हजार 533 च्या पार गेला आहे. दरम्यान देशात सर्वाधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत.
महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांचा आकडा 13 हजारच्या पार गेला आहे. त्यातच महाराष्ट्रातली आकडेवारी पाहिल्यावर मुंबईत रुग्णांचा आकडा जास्त आहे. त्यातच गेल्या 40 दिवसांपासून लॉकडाऊन असूनही कोरोनाच्या रुग्णांमध्ये कशी काय वाढ होत आहे आणि कोरोना पसरण्याचं प्रमाणही वाढत चाललं आहे. यासाठीच आता मनपानं अॅक्शन प्लान तयार केला आणि लॉकडाऊन असतानाही कोरोना पसरण्याचे कारण महापालिकेनं शोधून काढलं आहे.
असा केला मुंबई महापालिकेनं अभ्यास
मुंबईत कोरोना जास्त प्रमाणात पसरत आहे. याच कारण शोधण्यासाठी मुंबई महापालिकेनं मलबार हिलमधल्या डी विभागाचा शोध गेतला. या भागात आलिशान वस्ती आहेत. तसंच तिथं मध्यमवर्गीय चाळी आणि झोपडपट्टीही आहेत.
मलबार हिल या भागाचा समावेश मुंबईतल्या मनपा डी विभागात येतो. या भागातल्या कोरोनाबाधितांचे वर्गीकरण करुन अभ्यास करण्यात आला. त्यावेळी लक्षात आलं की, वैद्यकीय कर्मचारी, कुटुंबिय, पोलिस कर्मचारी यांच्यासोबतच परदेशी नागरिकांमुळे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि अनेक दिग्गजांची निवासस्थानं असलेल्या या भागात कोरोनाची सुरुवात झाल्याचं दिसलं.
मुंबई महापालिकेनं केलेल्या अभ्यासात कोरोना वाढल्याचं मुख्य कारण समोर आलं ते म्हणजे, लॉकडाऊन असल्यामुळे घरी कंटाळा येतो. त्यामुळे शेजाऱ्यांकडे जाऊन बसणाऱ्या लोकांमुळे कोरोना पसरण्याचं मुख्य कारण ठरलं आहे.
डी-विभागातील कोरोनाबाधितांचे वर्गीकरण
डी विभागात असलेल्या कोरोनाबाधितांच्या पूर्वविकारात 44 जणांना मधूमेह, 28 जणांना हायपरटेन्शन, 12 जणांना दमा, 12 जणांना किडनी विकार, 5 जणांना कर्करोगाचा विकार होते.
वाहन चालक, हॉटेल कॅशियर, किराणा दुकानदार, रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण हे लोकं मलबार हिल असलेल्या डी विभागात कोरोना पसरण्याचं मुख्य कारण ठरलं गेले.
सध्याची मलबारहिलची स्थिती काहीशी अशी आहे. 242 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 55 जण कोरोनामुक्त झालेत. एकूण 22 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मृतांचा वयोगट पाहिला गेल्यास 60 ते 79 वयोगटातील 12 जणांचा मृत्यू झाला. 80 आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या 3 जणांचा मृत्यू झाला. तर 40 ते 59 या वयोगटातील 6 रुग्ण आणि 20 ते 39 वयोगटातील एका रुग्णांचा मृत्यू झाला.
why corona patients count is increasing in mumbai read special report on mumbai fights corona
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.