मुंबई : उद्धव ठाकरेंचे माजी स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत शिंदे-फडणवीस सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची सुरक्षा मात्र काढून घेण्यात आली. त्यामुळं नार्वेकर चर्चेत आले होते. पण त्यांची सुरक्षा का वाढवण्यात आली, याचं कारण आता समोर आलं आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे. (Why did govt increase Milind Narvekar security reason came out)
या वृत्तानुसार, सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता नार्वेकरांना धोका असल्याचं राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेणाऱ्या समितीनं म्हटलं आहे. तसा अहवाल त्यांनी मुंबई पोलिसांना दिला आहे. त्यानुसार नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा एक्स सिक्युरिटीपासून वाय सिक्युरिटी प्लस एस्कॉर्ट करण्यात आली आहे.
यामध्ये महत्वाची बाब म्हणजे, मधल्या काळात मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार की ठाकरे गटात राहणार अशी चर्चा सुरु झाली होती. गणपतीच्या काळात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेटही घेतली होती. त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची मत मिळाली नव्हती. दरम्यान, त्यांचे शिंदे गटाच्या तसेच भाजपच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत.
या सर्व घडोमोडी पाहता उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिक नाराज असल्याची माहिती पोलिसांना दिली गेली. यामुळं सध्याची राजकीय घडामोडी स्फोटक बनली असून उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिक कसे रिअॅक्ट करतील हे सांगू शकत नाही. म्हणजेच नार्वेकरांना त्यांच्याच गटातील कार्यकर्त्यांकडून धोका असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं मुंबई पोलीस आणि या समितीनं खबरदारी म्हणून नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या या माहितीला शिंदे गटाचे आमदार नरेश मस्के यांनी देखील दुजोरा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.