मुंबईः रिपब्लिक इंडिया या वृत्तवाहीनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळताना अनेक निरिक्षणे नोंदविली आहेत. त्यानंतर अलिबाग सत्र न्यायालयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामींना पोलीस कोठडी मिळणार का?, याचा निर्णय गुरूवारी होणार आहे. अर्णब गोस्वामी यांना ४ नोव्हेंबर रोजी रायगड पोलिस आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली होती.
पोलिस कोठडी संदर्भात राज्य सरकारनं अलिबाग सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यानंतर न्यायाधीश मलिशेट्टी यांनी गुरुवारी निकाल जाहीर करु असं सांगितलं आहे. गोस्वामी यांच्यासह अन्य दोन आरोपींच्या पोलिस कोठडीबाबतही न्यायालय उद्याच निर्णय देईल. त्यानंतर या तिन्ही आरोपींच्या जामीनावरही सुनावणी होईल.
Will Arnab Goswami get police custody The decision will be made tomorrow
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.