Ajit Pawar on CM: "भाजपचे लोकही असा नारा देणार का?" शिवसेनेच्या जाहिरातीवरुन अजित दादांनी डिवचलं

अजित पवारांनी केली शिवसेनेच्या जाहिरातीची चिरफाड
ajit pawar
ajit pawaresakal
Updated on

मुंबई : शिवसेनेनं आजच्या वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जास्त तर देवेंद्र फडणवीस यांच्याबाजून कमी कौल दखावला आहे. तसेच देशात मोदी तर राज्यात शिंदे अशा मथळ्याखाली शिवसेनेनं जाहीरात केली आहे. पण हे भाजपच्या नेत्यांना मान्य आहे का? असा सवाल विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे. (Will BJP people also give such a slogan Ajit Pawar critisises over Shiv Sena advertisement)

ajit pawar
Gajanan Kirtikar: "शिवसेनेच्या 40 आमदारांमुळंच भाजप पुन्हा सत्तेत"; खासदार किर्तीकरांचा इशारा

शिवसेनेच्या जाहिरातीची चिरफाड करताना पवारांनी पत्रकार परिषदेत सडकून टीकाही केली. पवार म्हणाले, "मी स्वतः कसा लोकप्रिय याची स्पर्धा सरकारमधल्या महत्वाच्या पदांवरील लोकांमध्ये सुरु असलेली दिसते आहे. गेल्या निवडणुकीच्यावेळी आपण ऐकलं आहे की केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र, अशा पद्धतीच्या घोषणा भाजपवाले देत होते. पण आता ही घोषणा मागे पडली असून आता नवी घोषणा पुढे आली आहे. यात राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे ही ती घोषणा आहे. हे भाजपच्या नेत्यांना मान्य आहे का?"

ajit pawar
Ajit Pawar: "इतकेच लोकप्रिय आहात तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या"; अजित दादांचं CM शिंदेंना आव्हान

बावनकुळेंचा खुलासा ऐकायला आवडेल

नेहमी काही झालं का चंद्रशेखर बावनकुळे हे प्रत्येकवेळी खुलासा देतात. आता तुमचा खुलासा आम्हाला ऐकायला आवडेल. मी तुमच्या पक्षाच्या अंतर्गत विषयात नाक खुपसत नाही. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यासंदर्भातील जाहीरात आहे आणि त्या सरकारमध्ये तुमच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या जोरावर सरकार आहे. फडणवीस यांच्यापेक्षा जनता जास्त अनुकूल झालेली आहे हे भाजपला मान्य आहे का? असा सवालही पवारांनी यावेळी केला. (Latest Marathi News)

ajit pawar
Jack Dorsey: जॅक डॉर्सी काँग्रेसच्या 'टूलकीट'चा भाग! भाजप आयटीसेलच्या प्रमुखांचा आरोप

मुख्यमंत्र्यांनी स्वतःच हसं करुन घेतलं

शिंदेंच्या बाजूनं २६ टक्के आणि फडणवीसांच्या बाजूनं २३ टक्के कौल दाखवला आहे. पण त्यांना अशा जाहिराती का द्याव्या लागत आहेत कळत नाही. पण महाराष्ट्रातील जनता दुधखुळी नाही. पण काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रानं सर्वे केला होता तर त्यात ५ की ७ टक्के इतका कौल मुख्यमंत्र्यांच्या बाजूनं होता पण यांच्या सर्व्हेचा आकडा आता तर एकदम आकाशालाच गवसणी घालायला निघाला आहे. खरंतर जाहिरात देणाऱ्यांनी याबाबत आत्मपरिक्षण करण्याची नितांत गरज आहे. पण या जाहिरातीतून मुख्यंत्र्यांनी स्वतःचं हसं करुन घेतलं आहे, अशा शब्दांत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.