ओबीसींसाठी शिवसेना सोडलीत आता राष्ट्रवादी सोडणार का? टिळेकरांचा भुजबळांना सवाल

ओबीसी आरक्षणावरुन भाजप आक्रमक झाली असून मविआ सरकारविरोधात त्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला आहे.
Bhujabal_Tilekar
Bhujabal_Tilekar
Updated on

मुंबई : ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reseravtion) भाजप आक्रमक झाली असून मविआ सरकारविरोधात (MVA Govt) त्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला आहे. यावेळी भाजपचे ओबीसी सेलचे प्रमुख योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांनी मंत्री छगन भुजबळ यांना ओबीसी आरक्षणावरुन थेट सवाल केला आहे. शिवसेनेनं मंडल आयोगाला विरोध केला म्हणून तुम्ही शिवसेना सोडली मग आता राष्ट्रवादी काँग्रेसही सोडणार का? असं त्यांनी म्हटलं आहे. (Will Chhagan Bhujbal leave NCP now after leaving Shiv Sena due to Party opposed to Mandal Commission says Yogesh Tilekar)

Bhujabal_Tilekar
मंत्रालयावर भाजपाचा धडक मोर्चा; दरेकरांसह प्रमुख नेत्यांची घरपकड

टिळेकर म्हणाले, राज्याच्या निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर केली आहे. 31 मे रोजी ही सोडत निघणार आहे. यामुळं ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणार असून मुख्यमंत्री जरी मंत्रालयात नसतील तरी आमचा मोर्चा मंत्रालयापर्यत जाणार आहे. "ये तो एक झाकी है और अभी बाकी है"

Bhujabal_Tilekar
केंद्राचा मोठा निर्णय; एक जूनपासून साखरेच्या निर्यातीवर निर्बंध

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सरकारच्या कानफटात बसली आहे. महाविकास आघाडीचे मंत्री म्हणतात केंद्राने काय केलं? पण मध्य प्रदेशमध्ये साडेतीन महिन्यात डेटा तयार होतो तर महाराष्ट्रातील सरकार असा डेटा गोळा का करु शकत नाही? असा सवालही यावेळी टिळेकर यांनी विचारला.

Bhujabal_Tilekar
'न्यायालय काही सांगो, OBC आरक्षणाशिवाय महाराष्ट्रात निवडणूक नको'

महाविकास आघाडी सरकारकडे ओबीसींसाठी पैसे नाहीत. राष्ट्रवादीची पिलावळ ओबीसींच्या विरोधात आहे. शिवसेनेने मंडल आयोगाला विरोध केला म्हणून छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली होती मग आता राष्ट्रवादी सोडणार का? अशा शब्दांत योगेश टिळेकर यांनी ओबीसी नेते भुजबळांवर टीकास्त्र सोडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.