धूमकेतूचे दर्शन होईल का?  खगोलप्रेमींना लागली आहे आस...वाचा सविस्तर

धूमकेतूचे दर्शन होईल का?  खगोलप्रेमींना लागली आहे आस...वाचा सविस्तर
Updated on

ठाणे -  सुर्याभोवती 6800 वर्षांची दीर्घ वर्तुळाकार कक्षा पूर्ण करणारा निओवाईज धूमकेतू पृथ्वीभोवतीच्या अवकाशात दिसू लागला आहे. सोशल मिडीयावर या धुमकेतूची चर्चा सुरु झाल्याने खगोलप्रेमींना हा धूमकेतू पहाण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. परंतू मुंबई, ठाणे व उपनगरात आकाश अभ्राच्छादित असल्याने खगोलप्रेमींची निराशा होत आहे. 20 दिवस हा धूमकेतू साध्या डोळ्यांनी पहाता येणार असल्याने आकाश निरभ्र होऊन हा धूमकेतू एकदा तरी दिसावा अशीच आशा सगळे बाळगून आहेत. एकदा संधी हुकल्यास पुन्हा त्याचे दर्शन घडणार नसल्याने सारेच हा धूमकेतू दिसावा अशी आशा बाळगून आहेत.

नासाच्या 'निअर अर्थ ऑब्जेक्ट वाईल्ड फिल्ड इन्फ्रारेड सर्व्हे एक्सप्लोरर' (निओवाईज) या स्पेस टेलिस्कोपने या धूमकेतूचा शोध लावला असून 27 मार्चला हा धूमकेतू सुर्याजवळून जाताना आढळून आला. नासाच्या संकेतस्थळावर याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 3 जुलैला हा धूमकेतू सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ होता. आता तो सूर्यापासून लांब जात असून हा धूमकेतू पृथ्वीपासन सर्वात कमी अंतरावरुन म्हणजेच 10 कोटी किमी प्रवास करत आहे. 22 जुलैला तो पृथ्वीच्या जवळ येणार आहे. 14 जुलैपासून 4 ऑगस्टपर्यंत 20 दिवस हा धूमकेतू साध्या डोळ्यांनी पहाण्याची संधी सर्वांनाच लाभत आहे. या धूमकेतूचे काही फोटोही सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याने त्याविषयी जाणून घेण्याची व तो पहाण्याची उत्सुकता सर्वच खगोलप्रेमींना लागून राहीली आहे. परंतू मान्सूनचे आगमन झाले असून आकाश अभ्राच्छादित असल्याने खगोलप्रेमींची निराशा होत आहे. परंतू खगोलप्रेमींनी आशा सोडू नका असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण सांगतात. आत्ताच्या घडीला सुर्यास्तानंतर वायव्य दिशेला म्हणजेच उत्तर पश्चिमेच्या आकाशात हा धूमकेतू पहायला मिळत आहे. 17 जुलैनंतर 22 जुलैपर्यंत सूर्यास्तानंतर दिड ते दोन तास याचे दर्शन होणार असल्याने त्या दिवसांत तुम्हाला याचे दर्शन घडू शकते. सप्तर्षीच्या सरळ रेषेत खाली क्षितीजाजवळ तुम्हाला हा धूमकेतू पहाता येईल. आकाश निरभ्र होण्याची आपण सारेच वाट पहात आहोत. परंतू ही संधी कोणीही दवडू नका कारण एकदाच नजरेस पडणारा असा हा धूमकेतू आहे. यानंतर 6800 वर्षांनी त्याचे पुन्हा दर्शन होईल, परंतू त्यावेळी हाच धूमकेतू आपण 2020 साली पाहीला हे कोणालाही सांगता येणार नाही. 

धूमकेतू आणि कोरोनाचा संबंध नाही
धूमकेतूला शेपटी असते म्हणून त्याला शेंडेनक्षत्र असेही म्हणतात. साध्या डोळ्यांनी आकाशात शेपटी असलेला धूमकेतू अचानक दिसू लागला की लोकांमध्ये चर्चांना उधाण येते. प्राचीन कालापासून अनेक गैरसमज धूमकेतूविषयी चालत आलेले आहेत. धूमकेतू दिसायला लागला की पृथ्वीवर संकट येणार असाही एक गैरसमज आहे. निओवाईज धूमकेतू आकाशात दिसत असल्याने कोरोनाचे संकट अधिक वाढेल आणि मानव जातीचा संहार होईल असे काही लोक सांगतात, परंतू यामध्ये काहीही तथ्य नाही. धूमकेतूचा आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही असे सोमण यांनी सांगितले.

------------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.