दुर्लक्षित पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ वळवणार; एमटीडीसीचा खासगी कंपनीबरोबर करार

दुर्लक्षित पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ वळवणार; एमटीडीसीचा खासगी कंपनीबरोबर करार
Updated on


मुंबई ः महाराष्ट्रातील अपरिचित पर्यटनस्थळे लोकप्रिय करण्यासाठी राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) खासगी पर्यटन कंपनीसोबत भागीदारी करार केला आहे. करारांतर्गत घरगुती निवास योजनेला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे सामान्यांनाही याचा फायदा होणार आहे. 

घरगुती निवास आणि बेड अँड ब्रेकफास्ट पद्धतीची ही योजना आहे. त्यासाठी एमटीडीसीने एअरबीएनबी या प्रसिद्ध पर्यटन कंपनीसोबत भागीदारी केली आहे. यात प्रामुख्याने फारशा परिचित नसलेल्या पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओघ वळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे लहान गावांना याचा फायदा होऊन त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पर्यटकांनाही शेतातील वस्तीवर निवास, नांगरणी, बैलगाडीची सफर, गोठ्यातील अनुभव, हौदातील धमाल, घोडेस्वारी, गावातील आगळेवेगळे खेळ असे हटके अनुभव मिळणार आहेत. 
कोरोना पार्श्‍वभूमीवर नेहमीच स्वच्छताविषयक व आरोग्यविषयक नियम पाळण्यासाठी घरगुती निवासाची व्यवस्था करणाऱ्या घरमालकांना योजनेंतर्गत प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी वेबिनार व कार्यशाळा आयोजित केल्या जातील. यासाठी आरोग्यविषयक व स्वच्छताविषयक सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे सध्याच्या पर्यटन यंत्रणेला पाठबळ मिळेल, तसेच नव्या आणि अपरिचित पर्यटनस्थळांचीही प्रसिद्धी होणार आहे. मुंबईसारख्या शहराजवळ तासाभराच्या अंतरावर किंबहुना खुद्द मुंबई शहरातही अशी अनेक ऐतिहासिक, धार्मिक, पुरातन पर्यटनस्थळे आहेत. मात्र, त्यांच्याकडे कोणाचेही फारसे लक्ष जात नाही, या स्थळांना प्रकाशझोतात आणण्याचे काम या योजनेमुळे होणार आहे. 

पर्यटन क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न 
पर्यटकांना दर्जेदार पर्यटनाचा नितांतसुंदर अनुभव देणे, त्यांची सुरक्षितता जपणे, तसेच पर्यटन क्षेत्राचे पुनरुज्जीवन करणे, या हेतूंनी ही योजना आणली आहे, असे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. देशांतर्गत पर्यटनवृद्धी होऊन देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी ही भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे, असे एअरबीएनबीचे महाव्यवस्थापक (अग्नेय आशिया) अमनप्रीत बजाज म्हणाले. 

Will divert tourists to neglected tourist destinations MTDCs agreement with a private company 

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.