High Court: निवडणुकीच्या कामासाठी मुंबईबाहेर जावेच लागेल, पोलिसांना दिलासा देण्यास नकार

High Court: निवडणुकीच्या कामासाठी मुंबईबाहेर जावेच लागेल, पोलिसांना दिलासा देण्यास नकार
Updated on

Mumbai: निवडणुकीच्या कामासाठी मुंबईबाहेर ड्युटी करण्यास नकार देणाऱ्या २१ पोलिस अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलासा देण्यास नकार दिला. सुटीकालीन न्यायालयाचे न्या. संदीप मारणे व न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने पोलिस अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी मुंबईबाहेर जावेच लागेल, असे स्पष्ट करत मॅटच्या निर्णयाला स्थगिती दिली.

निवडणुकीच्या कामाला मुंबईबाहेर पोस्टिंग नको, यासाठी २१ पोलिस निरीक्षकांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. मॅटने त्यांना दिलासा देत बदली आदेशाला स्थगिती दिली होती. या निर्णयाला पोलिस महासंचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.