मुंबई: कोविडमुळे बेहाल झालेल्या मुंबईवर पाणी कपातीचे संकटही ओढावण्याची शक्यता होती. मात्र,1 ऑगस्ट पासून मुंबईसह कोकणात जोरदार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.तर गुरुवार सकाळ पर्यंंत मुंबई, ठाण्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.महापालिका प्रशासन जूलैच्या अखेरीस पाणीसाठ्या आढावा घेऊन निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणारा पहिला तलाव आज ओसंडून वाहू लागला आहे.तुळशी तलाव आज दुपारी 12 वाजल्याच्या सुमारस ओसंडून वाहू लागला. मुंबईसह महामुंबईत पावसाचे जूलै महिन्यात ओढ दिली.मात्र,गेल्या दोन दिवसापासून काही भागात सकाळच्या वेळी चांगला पााऊस होत असून गुरुवार पर्यंत अशीच परीस्थीती राहाणार आहे.तर 1 ऑगस्ट पासून मुंबईसह कोकणात जोरदार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.तर रायगड,रत्नागिरी आणि सिधूदुर्ग जिल्ह्यातील काही भागात आठवडाभर जोरदार पावसाचा अंदाज आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. मंगळवार(ता.28) सकाळ पर्यंत 4 लाख 73 हजार 113 दक्षलिटर पाणीसाठा जमा असून वर्षाच्या आवश्यक क्षमतेच्या 32.69 टक्के साठा आहे.गेल्या वर्षी आजच्या दिवसा पर्यंत 75.25 टक्के 10 लाख 89 हजार 155 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता.
दररोज 18 दशलक्षलिटर पाणीसाठा
तुळशी तलाव हा मुंबईला पाणीपुरवठा करणारा सर्वात लहान तलाव आहे.पुर्ण भरल्यावर या तलावात 804 कोटी 6 लाख लिटर पाणीसाठा जमा आहे.तर तलावातून रोज 18 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो.
तलाव आणि पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
- अप्पर वैतरणा - 39375
- मोडकसागर - 49273
- तानसा - 36473
- मध्य वैतरणा - 63210
- भातसा - 359193
- विहार - 17544
- तुळशी - 8046
------------------------------------------------
संपादन - तुषार सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.