गडकरींची डिप्लोमसी सोडवणार सेना भाजपतील सत्तास्थापनेचा तिढा ?

गडकरींची डिप्लोमसी सोडवणार सेना भाजपतील सत्तास्थापनेचा तिढा ?
Updated on

सत्तास्थापनेसाठी भाजपकडून घडामोडी वेगवान झाल्याचं पाहायला मिळतायत. अशातच शिवसेना आणि भाजपातील सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी नितीन गडकरी मुंबईत दाखल झालेत. आता नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीमुळे महाराष्ट्रातील महायुतीच्या सत्तास्थापनेचा पेच सुटणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

यातच, नितीन गडकरींच्या भेटीसाठी विनोद तावडे, संभाजी पाटील निलंगेकर, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख गडकरी यांच्या वरळीतील निवासस्थानी दाखल झालेत. नितीन गडकरी आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना भाजपात अडीच अडीच वर्षांची चर्चा झाली नव्हती असं मोठं विधान नितीन गडकरी यांनी केलंय. दरम्यान, आज झालेल्या चर्चेत नितीन गडकरी दिल्लीतून काही निरोप घेऊन आले आहेत का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. काही वेळानी नितीन गडकरी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ शकतात अशी देखील माहिती मिळतेय.  

वर्षावरील मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नितीन गडकरी उद्धव ठाकरेंचीही भेट घेऊ शकतात. नितीन गडकरी शिवसेनेशी संपर्क साधून सत्तेचा पेच सोडवू शकतात अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. मुंबईत पोहोचलेले गडकरी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंशी संवाद साधू शकतात. संघानं सत्तेचा पेच सोडवण्याची जबाबदारी गडकरींवर सोपवल्याची माहिती सूत्रांनी  सकाळ दिलीय. दरम्यान, काल गडकरींनी नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवतांशी चर्चा केली होती.

शिवसेनेकडून आमदारांभोवती तटबंदी  

दरम्यान मुंबईत रंगशारदाबाहेर राजकीय नाट्य रंगायला सुरवात झालीये. कारण, रंगशारदामध्ये शिवसेनेचे जे आमदार राहत होते त्यांना अज्ञातस्थळी हलवण्याच्या मोठ्या घडामोडी मुंबईतील घडताना पाहायला मिळतायत. शिवसेनेचे आमदार फुटू नये म्हणून शिवसेनेने आता मोठी तटबंदी केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. रंगाशारादा बाहेर 2 आलिशान बसेस उभ्या आहेत आहेत. आता फोडाफोडीचा घोडेबाजार होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शिवसेना आमदारांना सुरक्षित आणि अज्ञातस्थळी हलवण्याच्या घडामोडींना आता मुंबईत प्रचंड वेग आलाय. 

Webtitle : will nitin gadakari solve shivsena BJP government formation conflicts

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.