Mumbai Loksabha: भारत जोडो यात्रेमुळे मुंबईत होणार बेरजेचे राजकारण; भाजपचं टेंशन वाढणार?

Rahul Gandhi: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भारत जोडो यात्रा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.
Mumbai Loksabha: भारत जोडो यात्रेमुळे मुंबईत होणार बेरजेचे राजकारण; भाजपचं टेंशन वाढणार?
Updated on

Mumbai bharat jodo yatra News: 16 तारखेला राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईमध्ये येत आहे. ही यात्रा अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. केवळ काँग्रेससाठीच नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी मधली मरगळ हटवण्यासाठी ही यात्रा महत्त्वाची आहे.

राहुल गांधी मुंबईत येणार यामुळे मुंबई काँग्रेस आपापले वाद बाजूला ठेवून, पक्षात असलेली अंतर्गत गटबाजी बाजूला ठेवून कामाला लागली आहे. यामुळे भारत जोडो न्याय यात्रा काँग्रेससाठी संजीवनी ठरत आहे.(bharat jodo nyay Yatra)

Mumbai Loksabha: भारत जोडो यात्रेमुळे मुंबईत होणार बेरजेचे राजकारण; भाजपचं टेंशन वाढणार?
Bharat Jodo Nyay Yatra: राजकीय चिखलफेकीसाठी विठू माऊलीचा वापर! राहुल गांधींच्या सभेतील 'त्या' व्हिडिओचे चुकीचे दाखले

तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते देखील राहुल गांधींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची जमवा जमव अनेक नेते करत आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक संघटन हे जरी ठाकरे गटाचे असले तरी त्यानंतर ते भाजप आणि काँग्रेसच आहे. यामुळेच आगामी लोकसभेच्या अनुषंगाने मुंबईच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भारत जोडो यात्रा महत्त्वाची आहे.(bharat jodo in mumbai)

मुंबईत आल्यावर राहुल गांधी मोठ्या प्रमाणावर भेटीगाठी घेणार आहेत. यावेळी ते राज्यातील प्रमुख नेत्यांशी संवाद साधतील यात काही शंका नाही. याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही ते भेट घेतील. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भारत जोडो यात्रा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.(powar of shivsena and bjp in mumbai)

Mumbai Loksabha: भारत जोडो यात्रेमुळे मुंबईत होणार बेरजेचे राजकारण; भाजपचं टेंशन वाढणार?
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: त्र्यंबकेश्‍वर मंदिरात राहुल गांधींनी केला अभिषेक; ठिकठिकाणी स्वागत

मुंबईमध्ये शिंदे गटाची तितकी ताकद नाही हे वेळोवेळी आलेल्या सर्वेतुन दिसून आले आहे. ठाकरे गटाची ताकद ही मुंबईमध्ये शिंदेंपेक्षा खूप अधिक आहे. अशा वेळी बेरजेचे राजकारण केले तर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यास याचा थेट फायदा हा लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला होणार आहे. ज्या प्रकारे भारत जोडो न्याय यात्रा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह प्रगट करत आहे यामुळे शिवसेनेची आणि काँग्रेसची ताकद नक्कीच भाजपला टक्कर देणार यात काही शंका नाही.(voters of congress in mumbai )

असा जरी असलं तरी भारत जोडो न्याय यात्रेच्या नियोजनात मिठाचा खडा पडेल असं म्हटलं जात आहे. काँग्रेसचे बडे नेते यावेळी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. यात प्रामुख्याने एका उत्तर भारतीय नेत्याचे नाव समोर येत आहे.(mumbai news)

Mumbai Loksabha: भारत जोडो यात्रेमुळे मुंबईत होणार बेरजेचे राजकारण; भाजपचं टेंशन वाढणार?
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: बड्यांना कर्जमाफी, मग शेतकऱ्यांना का नाही? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल

बेरजेच राजकारण

याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर, २०१९ साली मुंबईमधील सहापैकी पाच ठिकाणी काँग्रेसने निवडणूक लढवली. यावेळी मोदींची प्रचंड लाट असतांना ही प्रत्येक मतदार संघामध्ये काँग्रेसला जवळ जवळ 30 ते 40 टक्के मतदान मिळालं होतं.

तर दुसरीकडे शिवसेनेने तीन जागा लढवल्या यात प्रत्येकी 50 टक्क्यांहून अधिक मतं स्वतःच्या बाजूला वळवण्यात शिवसेनेला यश आलं. शिवसेनेसोबत जरी भाजपची ताकद असली तरी देखील मुंबई मधला मराठी मतदार हा नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. हे वेळोवेळी दिसून आले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ते तर प्रकर्षाने जाणवलं. यामुळे आगामी काळामध्ये शिवसेनेच्या हक्काची मतं अधिक काँग्रेसच्या हक्काचे मतं नक्कीच भाजपच्या नाकी नऊ  आणू शकतात.(how congress and shivsena can troble bjp in mumbai)

Mumbai Loksabha: भारत जोडो यात्रेमुळे मुंबईत होणार बेरजेचे राजकारण; भाजपचं टेंशन वाढणार?
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींनी राम राम मंडळी म्हणत घातली साद; किसान शब्दाचा सर्वाधिक वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.