मुंबई: अयोध्येतील राम मंदिर तीर्थक्षेत्र विकास ट्रस्टने (ram mandir trust) खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह (congress) इतर विरोधी पक्षांकडून चौकशीची मागणी होतेय. दरम्यान घाटकोपरमधील भाजपा आमदार राम कदम (ram kadam) यांनी या प्रकरणावरुन शिवसेनेसह काँग्रेसला लक्ष्य केले आहे. (With folding hands shivsena should apologies to hindu community ram kadam)
"सर्व पुरावे समोर आले आहेत. आता हे सुर्यप्रकाशाइतकं स्पष्ट झालं आहे, राम मंदिर निर्माण कार्यात एक रुपया सोडा, एक पैशाचीही हेराफेरी झालेली नाही. अर्धवट माहितीच्याआधारावर शिवसेनेपासून अन्य पक्षांनी त्यांची साथ दिली, ज्या लोकांनी आमच्या साधू संतांवर बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव केला. राम भक्तांना रेतीच्या गोण्याबांधून शरयू नदीत टाकून दिलं, त्यांचं समर्थन शिवसेना करणार. काय झालय शिवसेनेला? कुठे गेलं त्यांचं हिुंदुत्व?" असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे.
"आमच्या साधू संतांनी राम मंदिरासाठी स्वत:च्या प्राणांच बलिदान दिलं, ते त्यागपूर्ण जीवन जगतायत. राम मंदिराचा निकालाला उशिरा व्हावा यासाठी, काँग्रेसने २२ वकिलांची फौज सुप्रीम कोर्टात उभी केली होती. शिवसेना त्यांचं समर्थन करणार" असं राम कदम यांनी म्हटलं आहे.
"एक पैशाचाही घोटाळा झालेला नाही. हे आता स्पष्ट झालय. त्यामुळे शिवसेनेपासून काँग्रेसपर्यंत सर्वच पक्षांनी आमच्या हिंदू समाजाला, साधू संतांना दुखावलय, त्यांनी हात जोडून हिंदू समाजाची माफी मागावी" अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.
काय आहे हे प्रकरण?
अयोध्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने खरेदी केलेल्या जमिनीवरून हा वाद उफाळला आहे. ही मुख्य मंदिराची जमीन नाही. मात्र येथे काही इतर मंदिरे उभी करण्याची परिषदेची योजना असल्याचे सांगितले जाते. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह तसेच समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करताना त्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने दोन कोटी किमतीची जमीन १८ कोटी रुपयांना खरेदी केली, असा आरोप संजय सिंह यांनी केला आहे. तसेच कुसुम पाठक या महिलेकडून १८ मार्च २०२१ रोजी १८ कोटी २० लाख रुपयांना जमीन खरेदीच्या व्यवहाराची नोंद करणारे अयोध्येतील ‘बिल्डर’ सुलतान अन्सारी हे आज अयोध्येतील घरातून सहकुटुंब बाहेर निघून गेल्याने वेगळे वळण मिळाले. विश्व हिंदू परिषद या आरोपांची स्वतंत्र चौकशी करेल, असे सांगतानाच विहिंपचे महासचिव चंपत राय यांनी सारे आरोप राजकीय असल्याचे सांगून फेटाळले आहेत. भाजपने राम मंदिराच्या निर्माण कार्यामध्ये अडथळे आणणाऱ्या विघ्नसंतोषी शक्तींकडून हे आरोप सुरू आहेत आणि ते निराधार आहेत, असे म्हटले आहे. उत्तर प्रदेश सरकार याची चौकशी करेल, असे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.