नालासोपारा : साक्षी ज्वेलर्स वरील दरोडा आणि हत्याकांडाचा 48 तासात छडा लावण्यात मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय टीमला यश आले आहे. 20 अधिकारी 70 कर्मचाऱ्यांच्या 15 टीमने ही कामगिरी केली आहे. यात दोन्ही मुख्य आरोपीना अटक केले असून, कोरोनामुळे काम नाही, पैशाची चणचण भाषत असल्यामुळे दरोडा आणि हत्याकांड केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपायुक्त महेश पाटील यांनी दिली आहे. (Mumbai News)
जॉन्सन व्हिक्टर बापिस्ता आणि मोहम्मद अफझल असे अटक दरोडेखोरांची नाव आहेत. नालासोपारा पश्चिम एस टी डेपो रोडवरील साक्षी ज्वेलर्स वर शनिवारी 21 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजता दरोडा टाकून, ज्वेलर्स मालक किशोर जैन यांची निर्घृणपणे हत्या करून आरोपी फरार झाले होते. दोन्ही आरोपी ज्वेलर्स, रेल्वे परिसरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन, आयुक्तालय क्षेत्रातील 20 अधिकारी, 70 पोलीस कर्मचारी यांच्या 15 टीम पोलीस तपासासाठी रवाना केल्या होत्या.
सीसीटीव्ही, तांत्रिक बाबी, गुप्तबातमीदार यांचा आधार घेत संयुक्तपणे सर्व टीम ने काम करून, मोहम्मद अफझल यास भाईंदर येथून तर जॉन बापिस्ता यास नालासोपारा प्रगती नगर येथून अटक करण्यास यश मिळविले आहे. या आरोपीना अटक करवून तपास केला असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
दरोडा आणि हत्याकांड कसे घडले
दोन्ही आरोपी हे इलेक्ट्रिशियन आहेत. या दोघांची कामाच्या निमित्ताने यांची आगोदरच ओळख होती. यातील जॉन्सन व्हिक्टर बापिस्ता हा सराईत गुन्हेगार असून यांच्यावर 2013 मध्ये बांद्रा आणि 2016 मध्ये अंधेरी याठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तर मोहम्मद अफझल हा नवखा आहे. कोरोना महामारीच्या काळात झालेल्या लॉक डाऊन मूळे काम मिळत नव्हते, पैशाची गरज होती, त्यामुळे या दोघांनी दरोड्याचा कट रचला होता. मागच्या एक महिन्यापासून चहा दुकानावर चहा पित साक्षी ज्वेलर्स ची रेखी केली होती. सर्व रेखी झाल्या नंतर शनिवारी 21 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजता हे दोन्ही आरोपीने ज्वेलर्स मध्ये प्रवेश करून, ज्वेलर्स मालक किशोर जैन यांना तिजोरी देण्यास सांगितली.
मालकाने यास विरोध करत आरडाओरडा केला असता त्याच्या तोंडात बोळा घालून त्याचा आवाज बंद केला, सेलो टेप ने त्याचे हातपाय बांधून, सोन घासायची काणास, धारदार हत्याराने त्याच्यावर वार करून त्याची निर्घृणपणे हत्या करून, दुकानातील दोन किलो चांदी घेऊन फरार झाले होते. पण तिजोरी उघडली नसल्याने सोन्याचे दागिने मात्र यांना लुटता आले नव्हते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.