Mumbai Crime News: महिलेने सहकाऱ्यांसोबत मिळून केली 14 कोटींची फसवणूक अन्...

तक्रार दाखल झाल्यानंतर महिलेसह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSakal
Updated on

Mumbai Crime News: नवी मुंबईत 14 कोटींची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या अन्य तीन सहकाऱ्यांसोबत मिळून कोट्यवधींची फसवणूक केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर महिलेसह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथक या प्रकरणाच्या तपास करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी जानेवारी ते मे 2023 या कालावधीत चिटफंडच्या माध्यमातून चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली.

आरोपींनी घेतलेले पैसे परत केले नाहीत. गुंतवणूकदारांनी त्यांच्या पैशांची मागणी केली असता आरोपींनी वेळेवर पैसे परत केले नाहीत. बराच वेळ आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूक केली.

गुंतवणुकदारांची 14.24 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले. गुंतवणूकदारांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी उरण पोलीस ठाण्यात ही कारवाई केली.

Mumbai Crime News
2000 Rupees Note: दोन हजारांच्या नोटांवरून बँकेत हाणामारी; बँक कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

चिट फंड काय आहे?

चिट म्हणजे वचनचिठ्ठी. बँकिंग व्यवहाराशी अत्यंत कमी संबंध येणाऱ्या असंघटित क्षेत्रातील गरजू व्यक्तींना आपल्या आर्थिक गरजा ताबडतोब भागवण्यासाठी निधी पुरविणारा स्रोत म्हणजेच चिट फंड. भिशीसारखाच बचतीचा हा प्रकार आहे.

चिट फंड गुंतवणुकीत धोका काय आहे?

कमी गुंतवणूक, सहज तारण विरहित कर्ज उपलब्धता या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे समान आचार-विचार असलेले छोट्या आकाराचे चिट फंड हे यशस्वी झाले असून यातील सभासदांना लाभांशरूपाने आपल्या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळत आहे.

मात्र या चिट फंड कंपन्यांमध्ये आता अनेक अनोळखी लोकांचा भरणा होऊन तेथे गैरव्यवहार होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

हे थांबण्यासाठी चिट फंड कायदा 1982 यात सुचवलेल्या प्रस्तावित दुरुस्त्या चिट फंड कायदा 2019 (सुधारित) नुसार मंजूर झाल्या आहेत. यानुसार केंद्र सरकारने चिट फंड योजना अधिक सुरक्षित केल्या आहेत.

Mumbai Crime News
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.