भूत काढण्याच्या नावाखाली भोंदूबाबांकडून महिलेला मारहाण

मारहाणीच्या व्हिडीओ वरून बाबांचा पर्दाफाश
भूत काढण्याच्या नावाखाली भोंदूबाबांकडून महिलेला मारहाण
sakal
Updated on

नालासोपारा: अंगात भूत आल्याच्या नावाखाली नालासोपाऱ्यात एका भोंदूबाबाने महिलेला क्रृरतेने मारहाण केली असल्याचा धक्कादायक विडिओ समोर आला आहे. नालासोपारा पश्चिम निलेमोरे गावातील श्री भैरवनाथ बाबा मंदिरात बुधवार ता 15 रोजी रात्री साडे सात वाजताची ही घटना आहे. भोंदू बाबांकडून महिलेला मारहाण होताना रस्त्यावरून जाणाऱ्या एका जागरूक तरुणाने हा व्हिडीओ काडून भोंदूबाबाच्या भोंदूगिरी चा पर्दाफाश केला आहे.

भूत काढण्याच्या नावाखाली भोंदूबाबांकडून महिलेला मारहाण
मंत्रालयातील आगीची मुंबई महापालिका अभियंत्यांना धग

ज्या महिलेला मारहाण झाली आहे त्या महिलेची मानसिक स्थिती खराब असून ती बोलण्याच्या मनस्थितीत नाही पण मला मारले एवढेच बोलताना समोर येत आहे. समोर आलेल्या व्हिडीओ वरून पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रदेच्या नावाखाली मंदिरातील बाबा सामन्या गोरगरीब जनतेला छळत आहेत हे स्पस्ट झाले आहे. या भोंदू बाबांवर आता कारवाही होणार का? की पोलीस याला पाठीशी घालणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेमराज नागदा असे बाबांचे नाव असून, सोनी संजय राजभर असे पीडित महिलेचे नाव आहे. पीडित महिला ही अंधेरी येथील एका खाजगी कंपनीत कामगार म्हणून काम करते तर तिचा पती पेंटर चे काम करत असून त्याला दारूचे वेशन आहे. हे नालासोपारा पश्चिम निलेमोरे गावातील आदिवासी पाडा येथे एका पत्र्याच्या घरात पीडित महिला आपल्या कुटुंबासोबत राहते. पीडित कुटुंबाच्या घराच्या बाजूलाच श्री भैरवनाथ बाबा मंदिर आहे. आणि या मंदिराचा हेमराज नागदा हा पुजारी आहे.

घटनेच्या एक दिवसांपूर्वी या महिलेला तिच्या पतीने दारू पिऊन मारहाण करून, रात्रभर घराबाहेर ठेवले असल्याचेही स्थानिकांनी सांगितले आहे. दुसऱ्या दिवशी बुधवारी महिला अंधेरी येथे कामालाही गेली होती. पण तिची प्रकृती बिघडल्याने तिला रात्री घरी आणण्यात आले होते. तिला दवाखान्यात नेण्याऐवजी पीडितेला तिच्या हेमराज या बाबाकडे मंदिरात घेऊन गेले. तिच्या अंगात मयत मुलाचा आत्मा शिरला आहे. असे सांगून तिला हाताला पकडून या बाबाने मारहाण केली आहे. ही मारहाण होताना एका जागरूक तरुणाने हा व्हिडीओ काढून भोंदूगिरीचा पर्दाफाश केला आहे.

नेमके व्हिडीओमध्ये काय

महिलेला मारहाण करतानाच्या व्हिडीओ मध्ये हेमराज नावाचा बाबा चक्क तिच्या हाताला धरून, हडकझिडक करीत, तिला त्याच्या हातातील लांब वस्तूने बेदम मारहाण करीत असताना स्पष्ट दिसत आहे. महिलेची मानसिकता चक्क बेशुद्ध अवस्थे प्रमाणे दिसत आहे. त्यानंतर महिला मंदिरातील मूर्ती समोर बसलेली आहे. तिच्या कपाळावर हात लावून, पुन्हा तिच्यावर पाणी शिंपडता ना बाबा दिसत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणे नेमकी घटना काय?

नालासोपारा पश्चिम निलेमोरे गावातील आदिवासी पाडा येथील काही महिन्यांपूर्वी 3 मुलांचा तलावात पडून मृत्यू झाला होता. त्या मुलांचा आत्मा कोणत्या ना कोणत्या महिला - मुलांच्या अंगात शिरतो, आणि जेव्हा त्यांचे मानसिक संतुलन बिघडते तेव्हा हा बाबा त्यांचे भूत-आत्मा बाहेर काढतो अशी मानसिक स्थिती तेथील काही नागरिकांची बनविण्यात आली आहे. पीडित महिले सोबतही तसेच करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. या परिसरात उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, मराठवाडा या परिसरातील हिंदू, मुस्लिम, संमिश्र वस्ती आहे.

येथील सर्वजण कुठेना कुठे काम करणारा गरीब वर्ग आहे. याच त्यांच्या गरिबीतील अज्ञानाचा फायदा हा बाबा घेत, कोणी विरोध केला की त्यांना धमकावतो, पोलीस नेतात सोडून देतात, यामुळे स्थानी नागरिकही कोणी थेट समोर येत नाहीत, जर कोणी समोर आले तर हिंदू मुस्लिम असा मुद्दा बनवून त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करतो असे नाव न टाकण्याच्या अटीवर स्थानिक महिला, नागरिकांनी सांगितले आहे.

महिलेला मारहाण झाल्याचा कोणीतरी व्हिडीओ काढला असल्याचे समोर आल्या नंतर आम्ही हेमराज बाबा, पीडित महिला व तिच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलावून जवाबा घेतला आहे. तो श्री भैरवनाथ मंदिराचा पुजारी आहे, कोणतीही भोंदूगिरी नाही असे प्राथमिक जवाबात समोर आले आहे. तरीही आमचा तपास सुरू असल्याचे नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास तुपे यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.