Kalyan Crime : पोलीस ठाण्याबाहेरच सासरच्या मंडळींनी विवाहितेचं फोडलं डोकं; पतीसह 6 जणांविरुध्द गुन्हा

कल्याणमध्ये राहणारे चंदन परमार यांच्यासोबत साधारण वर्षभरापूर्वी गायत्री हिचा विवाह झाला.
Kalyan Crime News
Kalyan Crime Newsesakal
Updated on
Summary

या मारहाणीत गायत्री परमार (वय 20) ही जखमी झाली असून तिच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

डोंबिवली : सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याने ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेली. मात्र, पोलीस स्टेशनच्या दारातच सासरच्या मंडळींनी तिला गाठलं आणि बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्याच्या (Kalyan Khadakpada Police Station) बाहेर घडली आहे.

या मारहाणीत गायत्री परमार (वय 20) ही जखमी झाली असून तिच्यावर उपचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी खडकपाडा पोलीस (Khadakpada Police) ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनच्या आवारातच विवाहित महिलेला सासरच्या लोकांकडून मारहाण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कल्याणमध्ये राहणारे चंदन परमार यांच्यासोबत साधारण वर्षभरापूर्वी गायत्री हिचा विवाह झाला. लग्न होऊन काही दिवस होत नाही तोच चंदन हा गायत्री सोबत किरकोळ कारणावरून वाद घालू लागला, मारहाण करू लागल्याचे गायत्रीने म्हटले आहे. गायत्रीने याबाबत बाजरपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल केली होती. त्यानंतर खडकपाडा येथील महिला तक्रार निवारण कक्षात देखील अर्ज केला होता.

Kalyan Crime News
Ichalkaranji Crime : घटस्फोटासाठी न्यायालयात का अर्ज केला? रागातून पत्नीवर कुऱ्‍हाडीनं हल्ला

दरम्यान, फेब्रुवारी 16 पासून गायत्री ही आपल्या माहेरी राहत होती. महिला तक्रार निवारण कक्षात दोन वेळा त्यांच्या तक्रारींवर समुपदेशन झाले. 25 मे रोजी शेवटच्या सुनावणी वेळी गायत्रीने आपण चंदन याच्यासोबत याच्यासोबत नांदत असून सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं ती म्हणाली. महिला तक्रार निवारण कक्षातील समुपदेशननंतर सर्व जण खाली आले. त्यावेळी परमार कुटुंबाने गायत्री व तिच्या आई-वडिलांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. गायत्रीने ही बाब पोलिसांना सांगितली.

पण, पोलिसांनी योग्य ते सहकार्य केले नाही. उलट अर्धा तास थांबा त्यांना आधी जाऊ द्या मग, तुम्ही जा असा सल्ला दिला. त्यानुसार गायत्री व तिचे आई-वडील अर्धा तासाने बाहेर पडले. पोलीस स्टेशन बाहेरील बारावे गांव रिक्षा थांबा येथे गायत्री व तिचे कुटुंब रिक्षा पकडून घरी जाण्याच्या तयारीत असताना परमार कुटुंबाने त्यांना रिक्षातून बाहेर खेचून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

Kalyan Crime News
Prithviraj Chavan : महामार्गावरील उड्डाणपुलाबाबत माजी मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरणाला दिले महत्वाचे आदेश

चंदनच्या भावाने गायत्रीला दगड मारल्यामुळे तिला दुखापत झाली. जर पोलिसांनी आधीच तक्रार घेतली असती तर हे सर्व घडलं नसतं असं गायत्रीचं म्हणणं आहे. पती चंदन विनोद परमार, सासरे विनोद विरा परमार, सासू हेमा विनोद परमार, दिर दीपेश विनोद परमार व अन्य दोघांविरोधात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kalyan Crime News
Nitesh Rane : 'मनमोहन सिंगांना स्वातंत्र्य नव्हतं, त्यामुळंच 140 कोटी जनतेनं मोदींच्या हातात सत्ता दिली'

याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील म्हणाले, महिला तक्रार निवारण कक्ष येथे समुपदेशनसाठी सदर दोन्ही कुटुंब आले होते. समुपदेशन झाल्यानंतर महिला तिच्या कुटुंबासोबत जात असताना तिच्या सासरच्या मंडळींनी तिला मारहाण केली आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()