Mumbai Accident News: ट्रकच्या धडकेत महिला ठार; शहरातील अवजड वाहनांचा प्रश्न ऐरणीवर, भिवंडीतील घटना

Mumbai Accident News: भिवंडीत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पतीसह दुचाकीवरून जात असलेल्या जोडप्याच्या दुचाकीला अवजड वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाठीमागे बसलेली महिला जागीच ठार झाली आहे.
Mumbai Accident News
Mumbai Accident NewsEsakal
Updated on

भिवंडीत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पतीसह दुचाकीवरून जात असलेल्या जोडप्याच्या दुचाकीला अवजड वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाठीमागे बसलेली महिला जागीच ठार झाली आहे. ही दुर्दैवी घटना भिवंडी शहरातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर दुपारी घडली आहे. या घटनेने शहरात हळहळ पसरली असून शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही अवजड ट्रक रस्त्यावर कसे धावतात असा प्रश्न नागरिक विचारत असून अवजड वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तेहसीन शहाबाज अंसारी (वय अंदाजे २५ वर्ष) असे महिलेचे नाव असून सदर महिला आपल्या पतीसह महापोली गावातील एका शाळेत शिक्षिकेचे काम करत होती. मागील वर्षभरापूर्वीच तिचा विवाह झाला होता.

Mumbai Accident News
Worli Hit And Run Case: मिहीर लूक बदलून पलायनाच्या होता प्रयत्नात! कारमध्येच...; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

आज ती महिला पती शहाबाज अंसारी यांच्यासह दुचाकीवरून वंजारपट्टी नाका येथील डॉ.एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर आली असता अवजड ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. सुदैवाने या अपघातात पती शहाबाज हा वाचला असून त्यास जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mumbai Accident News
Worli Hit & Run Case : "आता कुठे गेले टाळकुटेपणा करणारे मराठी कलाकार ?" ; वरळी हिट अँड रन केसवर संजय राऊतांचा मराठी सिनेविश्वाला संतप्त सवाल

शहरात होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका मिळण्यासाठी शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाच भर दुपारी अवजड वाहने उड्डाणपूलांवरून सोडली जात असल्यानेच महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या महिलेच्या मृत्यूस अवजड वाहने व वाहतूक पोलिसांचा दुर्लक्षित कारभार जबाबदार असल्याची प्रतिक्रिया शहरातील दक्ष नागरिकांकडून येत आहे.

Mumbai Accident News
Worli Hit and Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शहाच्या अडचणीत वाढ; कोर्टाने दिली १६ जुलै पर्यंत पोलिस कोठडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com