मुंबई : आपला नवरा परदेशात असताना अनेक महिलांचे विवाहबाह्य संबंध असलेलं आपण पाहिलं असेल पण त्यालाही काहीतरी मर्यादा असतात. सध्या असाच एक प्रकार समोर आला असून त्यामध्ये एका महिलेने आपल्या दुबईत असलेल्या नवऱ्याकडून प्रत्येक महिन्याला पैसे घेतले पण इकडे तिच्या प्रियकरावर उधळले.
पण ज्यावेळी येवढ्या खर्चाचा हिशोब देण्याची वेळ येईल असं तिला वाटलं त्यावेळी तिने प्लॅन केला आणि प्रियकराच्या मदतीने आपलंच घर फोडलं. हे ऐकून आपल्यालाही धक्का बसेल पण अशी घटना मुंबईत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईतील निखत अजगर खान या 38 वर्षीय महिलेला दुबईतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तिच्या पतीकडून दर महिन्याला घर आणि तिच्या वैयक्तिक खर्चासाठी 1 लाख रूपये मिळत होते. पण ती तिच्या प्रियकराला महागड्या वस्तू भेट देणे, त्याला बाहेर फिरायला घेऊन जाणे अशा कामांवर ते पैसे उडवत होती. काही दिवासांपुर्वी तिच्या पतीने भारतात येणार असल्याचं सांगितलं होतं.
नवरा भारतात आल्यानंतर आपल्याला पैशांचा हिशोब द्यायला लागेल या भितीने तिने स्वत:चेच घर फोडण्याचा निर्णय घेतला. ठरल्यानुसार 10 मे रोजी चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील 12 लाख रुपयांची रोकड आणि दागिने पळवले. त्यानंतर तिने पोलिसांत घरफोडीची तक्रार दिली. गुन्हा नोंद केल्यानतंर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि मिळालेल्या माहितीनुसार दहिसरमधील 35 वर्षीय कमर खानला अटक केली.
कमर खान या आरोपीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याच दिवशी नसीम खान (४०) याला अटक केली. खान याच्या घरात पोलिसांनी काही रक्कम आढळली. नसीम आणि निखत एकाच इमारतीत राहत असल्यामुळे निखत घरी नसल्याचा फायदा घेत त्याने चोरी केल्याचा संशय आम्हाला आला अशी माहिती मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहूराज रानवडे यांनी दिली.
नसीमची चौकशी करताना त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात, तो गेल्या एका वर्षापासून निखतसोबत फिरत होता. त्याचबरोबर तिच्या नवऱ्याने पाठवलेल्या पैशामध्ये तिने मला भेटवस्तू दिल्या असं त्याने पोलीस तपासात सांगितले. तिचा नवरा भारतात आल्यानंतर तिला त्या पैशांचा हिशोब मागू शकतो असा संशय तिला आल्यानंतर तिने नसीमला घर फोडून चोरी करण्यास सांगितले आणि पोलीस केस थंड होईपर्यंत त्या मौल्यवान वस्तू त्याच्या घरात ठेवण्यास सांगितल्या होत्या.
सदर प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर निखतने पोलिसांची दिशाभूल केल्यामुळे कमर खान आणि नसीम खान यांच्याविरोधातील खटला बंद करून निखत खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.