Mumbai Crime : धक्कादायक! टिटवाळा रेल्वे स्थानक नजीक फोनवर बोलत चाललेल्या महिलेला झुडपात खेचून केला अतिप्रसंग

याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी निशांत चव्हाण याला अटक केली
woman was talking on phone was dragged into bush near Titwala railway station abuse crime police
woman was talking on phone was dragged into bush near Titwala railway station abuse crime police Sakal
Updated on

डोंबिवली - टिटवाळा रेल्वे स्थानकात उतरून ती रुळावरून पायी चालत प्रवास करत होती. रुळावरून चालत असताना ती फोनवर बोलत असल्याने आपला कोणी पाठलाग करत आहे ही बाब तिच्या लक्षात आली नाही. तेवढ्यात एका नराधमाने तिला बाजूच्या झुडपात खेचून नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी निशांत चव्हाण याला अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला शहाड येथे एका खासगी कंपनीत काम करते.

सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ती शहाड रेल्वे स्थानकावरून लोकलने टिटवाळा रेल्वे स्थानकात आली होती. स्टेशनवर उतरल्यानंतर ही महिला शेजारीच असलेल्या रुळावरून आपल्या घराकडे जात होती. यावेळी एकजण तिचा पाठलाग करत होता.

पीडित महिला फोनवर आपल्या पतीशी बोलत असल्यामुळे ती गाफील होती. पाठलाग करणाऱ्या त्या नराधमाने तिला जबरदस्तीने रुळालगत असलेल्या झुडुपात ओढून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. याच दरम्यान पीडित महिलेचा फोन सुरूच होता.

दरम्यान या घटनेची कुठे वाच्यता केली तर जिवे मारण्याची धमकी या नराधमाने त्या महिलेला दिली. घाबरलेल्या महिलेने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला. पतीने लगेचच घडला प्रकार याच परिसरात राहणाऱ्या लोकांना फोन करून सांगितला आणि मदत मागीतली.

तत्काळ आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत या नराधमाला पकडलं व पोलिसांच्या स्वाधीन केलं. निशांत चव्हाणला अटक करण्यात आली असून कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निशांत हा पडघा येथे एका खासगी कंपनीत काम करतो. याप्रकरणी एसीपी मनोज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.