देशातील मुस्लिम मागासवर्गीय आहेत. देशातील मुसलमान राजकारणात येत नाहीत ते पराभवाला घाबरतात. भायखळ्यातील मतदारांनी मला आमदार केले. मुस्लिम समाजाने शिकले पाहिजे, स्वतः मुस्लिमच समाजात लीडर बनले पाहिजेत. मुस्लिम नेत्यांमध्ये क्वालिटी पाहिजे, असे वक्तव्य एमआयएम आमदार वारिस पठाण यांनी केले आहे.
मुस्लिम नेत्यांनी निवडणूक लढवली पाहिजे. लोकशाही मजबूत आहे. एक दिवशी हिजाब घालणारी महिला देशाची पंतप्रधान होईल, असा विश्वास वारिस पठाण यांनी व्यक्त केला.
माजी आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान यांच्या अब्सेंट इन पॉलिटिक्स अँड पॉवर पुस्तकाचे उद्घाटन सुधींद्र कुलकर्णी, इम्तियाज जलील, वारिस पठाण आणि आमदार रईस शेख यांच्या हस्ते मुस्लिम जिमखाना येथे पार पडले. गेल्या काही वर्षांत मुस्लिम समुदायावर जे हल्ले झाले. त्यावर आधारित पुस्तक आहे. यावेळी वारिस पठाण बोलत होते. (Latest Marathi News)
कार्यक्रमात राडा -
यावेळी कार्यक्रमात राडा देखील झाला. नसीम खान आणि इम्तियाज जलील यांच्यात वाद झाला. एमआयएममुळे बिहार, बंगालमध्ये भाजपला विजय झाला. नेमकं तुम्ही कुणाच्या बाजूने आहात, असा सवाल उपस्थित झाल्यानंतर वाद झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.