मुंबई: कोरोना व्हायरसमुळे (corona virus) सध्या मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंद आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात इतरवेळेपेक्षा कमी गर्दी असते. पण गर्दी (rush) कमी असली, तरी लोकल प्रवासात दुर्घटनांचे सत्र कायम आहे. मुंबई लोकलच्या (Mumbai local) प्रवासात दरवाजाजवळ उभं असताना, खांबाला धडकून किंवा ट्रेन पकडताना (train accident) दुर्घटना होत असतात. काहीवेळा प्रवाशांना या अशा दुर्घटनांमध्ये प्राणाला मुकावे लागते, तर काहीवेळा नशीब बलवत्तर असल्यामुळे प्रवाशी बचावतात. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर गर्दी कमी असली, तरी दर आठवड्याला अपघातांचे सत्र कायम आहे. (Women constable save life of one train commuter in mumbai)
काल सकाळी हार्बर मार्गावरील वडाळा रेल्वे स्थानकात एक प्रवासी महिला कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे थोडक्यात बचावला. रविवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली. वडाळा रेल्वे स्थानकात गर्दीच नव्हती. स्थानक पूर्णपणे रिकामे होते. प्रवासी आरामात ट्रेनमध्ये चढू शकत होते, तरीही हा अपघात घडला.
लोकल वडाळा स्थानकात थांबली होती. लोकल सुरु झाल्यानंतर एक तरुण त्या मधून उतरला व काही सेकंदांनी तीच लोकल पकडण्याच्या प्रयत्नात होता. धावत ट्रेन पकडणं त्या तरुणाला जमलं नाही. डब्यातील खांबाला पकडण्याचा प्रयत्न करत असताना, तो तरुण खाली पडला.
तो ट्रेन खाली जाणार होता. पण त्यावेळी तिथेच ड्युटीवर उपस्थित महिला कॉन्स्टेबल लगेच मदतीसाठी धावल्या व त्या तरुण प्रवाशाला खेचून बाहेर काढलं. सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर इजा झाली नाही. फलाट क्रमांक १ वर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्याचा या प्रवाशाचा प्रयत्न होता. प्रवाशाला वाचवणाऱ्या कॉन्स्टेबलचं नाव RPF स्टाफ दीपा रानी आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.