women cricketer : महिला क्रिकेटपटूची भरारी

हर्ली गालाने मोठ्या हिमतीने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले आहे
 Hurley Gala
Hurley Gala sakal
Updated on

अनेक उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू सध्या आपली चमक दाखवत आहेत. मुंबईतील हर्ली गालाही त्यांपैकीच एक. लहानपणापासूनच खेळाची आवड, जिंकण्याची जिद्द आणि खडतर परिश्रम याच्या जोरावर तिने १९ वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघात स्थान मिळवले आहे. टी-ट्‍वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी ती सज्ज झाली आहे.

हूमध्ये राहणाऱ्या हर्ली गाला हिला लहान असल्यापासून विविध खेळांची आवड. सध्या महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणाऱ्या हर्लीने दहावीपर्यंत ग्रँट रोडमधील सेंट कोलंबा शाळेत शिक्षण पूर्ण केले. खेळावर निस्सीम प्रेम करणाऱ्या हर्लीने वयाच्या पाचव्या वर्षापासून स्केटिंगला सुरुवात केली. स्केटिंग प्रकारात ती एवढी पारंगत झाली की तिने ६५ सुवर्णपदके पटकावली आहेत.

धावण्याच्या स्पर्धेत व लांब उडीतही हर्लीने सुवर्णपदकांची कमाई केली आहे. वयाच्या १२ व्या वर्षांपासून ती क्रिकेटकडे वळली. शाळा आणि विभागाअंतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांत खेळताना तिने संघाला अनेक विजय मिळवून दिले. हर्लीच्या वडिलांचे स्वप्न होते, की आपल्या मुलीने क्रिकेटमध्ये भरारी घ्यावी. त्यासाठी हर्लीने २० वर्षांपासून क्रिकेट खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या सेंट कोलंबा शाळेत आठवीच्या वर्गात प्रवेश मिळविला आणि तिथून पुढे तिचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला जो आज दक्षिण आफ्रिकेपर्यंत जाऊन पोहचला आहे. १४ ते १९ जानेवारीदरम्यान द. आफ्रिकेत १६ देशांदरम्यान होणाऱ्या टी-ट्‍वेंटी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी ती आता सज्ज झाली आहे.

दररोज जुहू येथून हर्ली ग्रँट रोडमधील शाळेत क्रिकेट शिकण्यासाठी येत होती. पहाटे चार वाजता उठून मेहनत सुरू करायची. नित्यनेमाने तीन तास सराव, व्यायाम आणि पोषक आहार अशा सर्व गोष्टी तंतोतंत पाळाव्या लागतात, असे हर्ली सांगते. नेगीव क्रिकेट अकादमी आणि सेंट कोलंबा शाळेचे क्रिकेटचे प्रशिक्षक आयवॉन रॉड्रिक्स यांच्या मार्गदर्शनाखाली तिने क्रिकेटचे धडे घेतले. क्रीडा शिक्षिका शुभांगी दळवी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका शुभदा केदारी यांचेही मोलाचे मार्गदर्शन तिला मिळाले.

वडील तन्मय आणि आई भाविका गाला यांनी मला वेळोवेळी भक्कम पाठबळ दिले. त्यांचा पाठिंबा आणि विश्वासामुळेच मी आज इथपर्यंत येऊन पोहचली, असे हर्ली गाला अभिमानाने सांगते.

शाळेतर्फेही सत्कार

हर्ली गालाने मोठ्या हिमतीने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले आहे. तिच्या यशाचे कौतुक करण्यासाठी शाळेनेही नुकताच तिचा सन्मान केला. शाळेतील मुलींसाठी आदर्श असलेल्या हर्लीचे शाळेत दमदार स्वागत झाले. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.