women day 2023 : महिला गिर्यारोहक घडवणारी रणरागिणी

महाडच्या शलाका वारंगे यांनी साहसी वृत्तीतून चोखंदळली अनोखी वाट
शलाका वारंगे
शलाका वारंगे sakal
Updated on

महाड : घरामध्ये झुरळ, पालीला घाबरणाऱ्या महिला जेव्हा काटेरी रानवाटा तुडवत, खडतर व दमछाक करणारे डोंगर पार करत एखादी साहसी मोहीम यशस्वी करतात तेव्हा त्‍यांच्या साहसी वृत्तीला दाद द्यावीशी वाटते.

अशीच साहसीवृत्ती महाडमधील आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध गिर्यारोहक शलाका वारंगे यांच्यामध्येही आहे. अनेक वर्ष शेकडो महिलांना आपल्या दिनक्रमातून बाहेर काढून त्यांच्यामध्ये गिर्यारोहणाचा छंद आणि साहसी वृत्ती जपण्याचे काम वारंगे लीलया पार पाडत आहेत.

गिर्यारोहण क्षेत्र म्हटलं की यामध्ये साहस आलेच. मोठमोठे ट्रेक पार पडताना शारीरिक कसोटी देखील ठरत असते. अशा क्षेत्रापासून महिला या लांबच राहत असतात .परंतु याच महिलांना गिर्यारोहणाच्या छंदातून त्यांच्यातील व्यक्तिमत्त्व विकास करण्याचे काम शलाका या पार पडत आहेत.

महाडच्या सह्याद्री मित्र या त्यांच्या संस्थेतर्फे केवळ महिलांसाठी तेरा वर्ष सतत नवनवीन किल्ल्यांच्या मोहीम त्या आयोजित करतात. सुरुवातीला तळागड, मानगड, सुरगड, अवचित गड, मधुमकरंद गड, कर्नाळा, लोहगड, कांगोरी गड, मोहन गड, सरसगड, रसाळगड अशा अवघड किल्ल्यांची सैर त्यांनी या महिलांना घडवून आणली आहे. छोट्या छोट्या ट्रेक करणाऱ्या या महिला त्यांच्यातील शारीरिक क्षमतेची जाणीव झाल्याने आता थेट हिमालयालाही गवसणी घालू लागल्या आहेत.

शास्त्र शाखेची पदवी घेतलेल्या शलका गावडे- वारंगे यां सतरा वर्ष ब्युटी थेरपिस्ट म्हणून काम पाहत आहेत .याशिवाय त्या योग शिक्षिका देखील आहेत. महिलांसाठी योग वर्ग घेत असतानाच १९९६ मध्ये त्यांनी निसर्ग मित्र या संस्थेतर्फे अलिबाग ते किहिम बीच हा पहिला ट्रेक केला. त्यानंतर त्यांच्यामध्ये गिर्यारोहणाची प्रचंड आवड निर्माण झाली. सायकलींग आणि भटकंती करत त्यांनी संपूर्ण भारत पालथा घातला आहे.

सायकल मोहीम यशस्‍वी

सध्या शलाका वारंगे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या रायगड जिल्हा सचिव आहेत तर सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या सदस्य आहेत. नवापूर ते महाबळेश्वर ही सहाशे किमीची सायकल मोहीम यांनी यशस्वीपणे पार पडली होती.

हिमालयातील १७ हजार ६०० फुटावरील एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प या ठिकाणी २५ वर्ष ट्रेकिंगचे प्रशिक्षण देत आहेत.

मुलांसाठी निसर्ग व साहस शिबिराच्या आयोजन केले जाते. हिमालयातील बेसिक व ॲडव्हान्स गिर्यारोहण प्रशिक्षण मुलांना व महिलांना देण्यामध्ये त्या सातत्याने प्रयत्न करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()