मुंबई: मुंबईत महिलांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांची (crime against women) संख्या वाढत चालली आहे. आता एका वकिल असलेल्या महिलेनं (women lawyer) तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात एका वकिल महिलेनं सात जणांविरोधात बलात्कार, विनयभंगाचा (molestation) आरोप करत गुन्हा नोंदवला आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी दोन वकिलांसह सात जणांविरोधात बलात्कार, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये वरिष्ठ वकिलांसह दोन महिलांचाही समावेश आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी सात आरोपींविरोधात भांदवि कलम 376, 354, 354(अ)(1)(2), 306, 385. 506, 504, 323 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेवर बलात्कार करून तिची अश्लिल व्हिडिओ क्लिप काढून महिलेकडे 50 लाखांची मागणी करण्यात आली. (Women lawyer file rape complaint in marine drive police station mumbai dmp82)
तक्रारदार आरोपींच्या लॉ फर्ममध्ये तीन महिने कामाला होत्या त्यावेळी हा प्रकार झाल्याचा आरोप आहे. पीडित महिलेवर बलात्कार करून तिची अश्लिल व्हिडिओ क्लिप काढून महिलेकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी केली. ऐवढ्यावरचं न थांबता आरोपींनी पीडिते चेहरा विद्रुप करून मारण्याची धमकी दिली आहे. तसेच पीडितेला मानसिक व शारिरीक ञास देऊन तिला आत्महत्या करण्यास केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. तसेच काही आरोपींवर चोरीचा आरोप आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.