Navi Mumbai: सार्वजनिक शौचालयाविना महिलांची कुंचबणा !

Navi Mumbai
Navi Mumbaiesakal
Updated on

Navi Mumbai: नवी मुंबईतील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात सार्वजनिक शौचालयाची सुविधा नसल्यामुळे कामानिमित्त आलेल्या कर्मचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: महिला कर्मचाऱ्यांची मोठी कुचंबणा सहन करावी लागत आहे. तसेच औद्योगिक वसाहतीत येणारे ट्रकचालक आणि वाहक, कर्मचारी उघड्यावरच प्रातर्विधी करत असल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.

Navi Mumbai
Navi Mumbai : अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीची १४व्या मजल्यावरुन उडी!

महापालिकेकडून ठाणे-बेलापूर रस्त्यासह विविध डेपोमध्ये ई-टॉयलेट उभारले आहेत. सध्या त्या टायलेटलाही टाळे ठोकण्यात आले आहे. सार्वजनिक टॉयलेटची सुविधा नसल्यामुळे लघुशंका करायची कुठे, असा प्रश्न एमआयडीसीमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पडत आहे. त्यामुळे नाइलाजास्तव उघड्यावर लघुशंका करावी लागत आहे.

एमआयडीसीमध्ये पालिकेचे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्यामुळे एमआयडीसी व उद्योजकांच्या माध्यामातून रस्ते दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. पालिकाही एमआयडीसीबाबत दुजाभाव करत आहे. एमआयडीसीमध्ये कोणत्याही प्रकारची व्होटबँक नसल्यामुळे लोकप्रतिनिधी या भागाबद्दल कधीच आवाज उठवत नाहीत, असे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

जागा उपलब्ध केल्यास सुविधा देऊ!

नवी मुंबई महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त बाबासाहेब रांजळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एमआयडीसीने जागा उपलब्ध केल्यास एमआयडीसी परिसरात शौचालये बांधता येऊ शकतील, असे सांगितले. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एमआयडीसीतील संघटनांनी मागणी केल्यास शौचालयासाठी जागा उपलब्ध करून देता येईल. एमआयडीसीच्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष के. आर. गोपी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Navi Mumbai
Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक धोरणात झाले महत्वपूर्ण बदल ; घेतला हा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.