मुंबई - धावत्या सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये पुन्हा एका तरुणीवर शारिरीक लगट करण्याचा प्रयत्न करण्याची घटना बुधवारी (ता.१६ जानेवारी) समोर आली. सीएसएमटी ते मस्जिद रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग करुन तिला मारहाण केली.तर दुसरी घटना अंधेरी स्थानकांवरील लिफ्टमध्ये एक तरुणीशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन्ही घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास कॉलेजला जाण्यासाठी एका तरुणीने सीएसएमटी-पनवेल लोकल पकडली. तरुणी सामान्य श्रेणीच्या डब्यात चढली होती. सकाळची वेळ असल्याने डब्यात ती एकटीच होती. लोकलने वेग पकडताच एक तरुण लोकलमध्ये चढला. तरुणाने तरुणीशी गैरवर्तन करण्यास सुरुवात करताच तिने त्याला लोकलमधून उतरण्यास सांगितले.
त्यावरुन तरुण तरुणीला शिवीगाळ करत धक्काबुक्की करु लागला. दरम्यान शेजारील दिव्यांग प्रवाशांच्या डब्यातील एक प्रवाशाने हा प्रकार पाहिला आणि तरुणावर ओरडला. घाबरलेला तरुण मस्जिद बंदर स्थानकात लोकल येत असताना उडी मारुन फरार झाला. या घटनेनंतर सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेल्या आहे. तसेच स्थानकांवरील सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु आहे.
लिफ्टमध्ये विनयभंग -
दुसरी घटना अंधेरी स्थानकांच्या प्लँटफॉर्म क्रमांक तीन वर असलेल्या लिफ्टमध्ये घडली आहे. पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास एक २६ वर्षीय तरुणी दादरवरून अंधेरी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म ३ वर उतरली. त्यानंतर लिफ्टच्या मदतीने तिने जाण्याचा निर्णय घेतला.लिफ्टमध्ये प्रवेश करताच एक तरुण लिफ्टमध्ये शिरला.
त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याने तिने आरडाओऱड केली. लिफ्टचे दरवाजे उघडताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु महिलेने होमगार्डने त्याच्या पाठलाग करुन त्याला पकडले. इशबू पटेल(२१) असे आरोपीचे नाव आहे.
यापूर्वी १४ जून २०२३ रोजी सुद्धा सीएसएमटी ते मशीद स्थानकांदरम्यान धावणाऱ्या सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये एका तरुणीवर एका इसमाने शारिरीक लगट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. तेव्हा आरोपीला चार तासात पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या घटनेला तीन दिवस होऊन सुद्धा आरोपीला अटक करण्यात पोलिसाना यश आले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.