नेटफ्लिक्समध्ये सर्वाधिक महिलांचा सहभाग; महिलाकेंद्रित वेबसीरिजचे प्रमाण अधिक

women's participation in Netflix
women's participation in Netflix sakal media
Updated on

मुंबई : लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) नेटफ्लिक्स (Netflix) तिच्या सर्वसमावेशकता या गुणधर्मासाठी ओळखली जाते. केवळ महिला सक्षमीकरणासाठी (women's empowerment) पुढाकार न घेता नेटफ्लिक्समध्ये ५१ टक्क्यांहून अधिक कर्मचारी महिला असून त्या विविध पदांवर महत्त्वाच्या पदांवर भूमिका बजावत आहेत. नेटफ्लिक्समध्ये महिलांचे प्रमाण आणि भागीदारी अधिक आहे. तसेच महिलाकेंद्रित वेबसीरिजचे (web series on Netflix) प्रमाण नेटफ्लिक्सवर अधिक असल्याचा अभिमान वाटतो, असे जागतिक महिला दिनानिमित्त नेटफ्लिक्सकडून सांगण्यात आले.

women's participation in Netflix
Thane | ठाण्यात भंगार गोडाऊनला आग, अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल

मनोरंजनात महिलांचे प्रतिनिधित्व काळानुसार वाढत आहे. नेटफ्लिक्सवर आताचा काळ आणि समाजाचे खरे प्रतिबिंब असलेल्या अस्सल कथांसह जगाचे मनोरंजन करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. २०२० च्या सुरुवातीपासून भारतातील २४०० हून अधिक महिला निर्मात्या, प्रतिभाशाली आणि क्रू सदस्य कार्यरत आहेत. २०२१ मधील मूळ चित्रपट आणि मालिकांपैकी निम्‍म्या मालिकांमध्ये महिला ही मध्यवर्ती पात्र होती. २०२१ मध्ये नेटफ्लिक्सने जवळपास ५० हून अधिक महिला निर्मात्या, दिग्दर्शिका किंवा लेखिकांसोबत काम केले. याशिवाय नेटफ्लिक्सने महिला स्टँडअप कॉमिक्स- रयताशा राठौर, उरूज अशफाक, प्रशस्ती सिंग, प्राजक्ता कोळी, सुमुखी सुरेश, मल्लिका दुआ, कनीज सुरका आणि सुमैरा शेख यांच्यासोबतही काम केले आहे.

सर्वसमावेशकता हा भाव नेटफ्लिक्समध्ये असण्याचे कारण म्हणजे आमच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५१.७ टक्के महिला कर्मचारी आहेत. २०२० मध्ये ही संख्या ४८.७ टक्के एवढी होती. यामध्ये महिला संचालकांची ६.९ टक्के भर पडली आहे.
- तान्या बामी, मालिका प्रमुख, नेटफ्लिक्स इंडिया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.