...अन्यथा औद्योगिक न्यायालयात धाव,भाटिया रुग्णालय प्रशासनाला इशारा

workers prohibition strike
workers prohibition strikesakal media
Updated on

मुंबई : भाटिया रुग्णालयातील (Bhatia hospital) कंत्राटीकरणाविरोधात (Against contract work) तेथील कर्मचारी युनियनने (Workers union strike) नुकतेच निषेध आंदोलन केले. कंत्राटीकरण न थांबल्यास त्याला औद्योगिक न्यायालयात (industrial court) आव्हान दिले जाईल, असेही सांगण्यात आले. ( Workers union prohibition strike against Bhatia hospital contract work-nss91)

रुग्णालयात पंचवीस ते तीस वर्षे सेवा केलेल्या कायमस्वरुपी कामगारांना काढून त्याजागी कमी पगाराच्या कंत्राटी कामगारांना घेण्याचा रुग्णालय प्रशासनाचा डाव असल्याची टीका भाटिया जनरल हॉस्पीटल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस दिलीपदादा जगताप यांनी केली. हॉस्पीटल आर्थिकदृष्ट्या नफ्यात असूनही कायम कामगारांना सक्तीने निवृत्ती दिली जात आहे. सध्या फार्मसी विभाग कंत्राटी तत्वावर चालविला जात असून नंतर इतर विभागांमध्येही कंत्राटी पद्धत येईल, असेही युनियनच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

workers prohibition strike
भंगार विक्री करुन पश्चिम रेल्वेचा विक्रम, जमवला १०० कोटींचा गल्ला!

या प्रकाराविरुद्ध जगताप, युनियनचे प्रवीण मंत्री, एसटी काँग्रेस कामगार युनियनचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे आदींनी व अन्य कर्मचाऱ्यांनी काळ्या फीती लावून आंदोलन केले. या कंत्राटीकरणाविरोधात युनियनचे अध्यक्ष व आमदार भाई जगताप यांनी व्यवस्थापनाला इशारा दिला असून त्याविरोधात कामगार न्यायालयात दाद मागितली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.