World Heart Day: दररोजचा व्यायाम आणि जपा आपले छंद, तणावमुक्तीतून हृदय ठेवा तंदुरुस्त

Latest Mumbai News: पद्मश्री डॉ रमाकांत पांडा यांचा सल्ला
World Heart Day: दररोजचा व्यायाम आणि जपा आपले छंद, तणावमुक्तीतून हृदय ठेवा तंदुरुस्त
Updated on

विनोद राऊत

Latest Mumbai News: भारत आता जागतिक हृदयविकाराचे केंद्रबिंदू म्हणून समोर आला आहे. बदलती आणि स्पर्धात्मक जीवनशैली त्याला जबाबदार आहे. मात्र कामाचा व जिवनातील इतर तणाव आपल्याला हाताळता आले पाहीजे. धकाधकीच्या या जिवनात मन व शरिराला आनंदी ठेवणारे छंद आवर्जुन जपा, त्यासाठी वेळ काढा.

दररोज व्यायाम, योग केल्यास हृदविकाराचा धोका १०० टक्के टाळता येवू शकतो व एक स्वस्थ व निरोगी जिवन जगता येते, असे जगातील आघाडीचे हृदय शल्यविशारद व एशियन हार्ट इन्स्टिटूटचे संचालक डॉ. रमाकांत पांडा यांनी सांगीतले.जागतिक हृदयदिनाच्या निमित्ताने त्यांनी 'सकाळ'सोबत संवाद साधला.

आयुष्यात काम करणे महत्वाचे आहे. त्यातून तणाव येतो, मात्र काम आणि जिवनाचा समतोल साधता आला पाहीजे, असे डॉ. रमाकांत पांडा यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगीतले. देशातील क्रमांक एकचे हृदरोग तज्ञ असलेल्या पांडा यांनी आतापर्यंत २८ हजार यशस्वी हृदयस्त्रक्रिया केल्यात,

ज्यात १९०० रेडो बायपास शस्त्रक्रियांचा समावेश आहे. आजकाल सर्वांच्या जिवनात कामाचा तणाव वाढला आहे. तो कमी करण्यासाठी मी दिवसभर वेळ मिळेल तेव्हा चांगले संगीत ऐकतो. महिन्यातून दोन विकेंडला थेट जंगलात जावून मी वाईल्ड फोटोग्राफीचा माझा छंद जपतो असेही डॉ. रमाकांत पांडा यानी आवर्जुन सांगीतले.

डॉ पांडा सांगतात की कधीकाळी हृदविकार हा पाश्चिमात्य देशातील रोग समजला जायचा. मात्र गेल्या पाच दशकात आपली जीवनशैली झपाट्याने बदलली त्यातून हृदविकाराचा धोका अधिक वाढल्याचे ते म्हणाले.युवकामध्ये वाढत्या तंबाखू, सिगारेटच्या व्यसनामुळे हृदविकार बळावला असल्याचे त्यांनी सांगीतले.

व्यायाम अत्यावश्यक

आताचे जिवन हे तणावपुर्वक आहे मात्र तणाव तूम्ही कसे हाताळता, त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहे.कामात तणाव वाढला तर कामातून १० मिनीटाचा ब्रेक घेवून योग व प्राणायम करा. तणावमुक्तीचा यापेक्षा दुसरा चांगला मार्ग नाही.

मला दिवसभरात जसा वेळ मिळाला तसा मी योगा करतो असे डॉ. रमाकांत पांडा यांनी सांगीतले.मात्र दररोजचा व्यायाम हा तणाव कमी करण्याचा शाश्वत आणि कायमस्वरुपी मार्ग आहे.व्यायामामुळे फिल गूड हॉ़र्मोन तयार होतात व स्ट्रेस हॉर्मोन लेवल कमी होते.रात्री लवकर झोपा किंवा ८ तासाची झोप पुर्ण करा व हृदय तंदुरुस्त ठेवा असा मोलाचा सल्ला पांडा यांनी दिला.

कुटुंब,मित्रासाठी वेळ द्या

प्रत्येकाने आपले छंद जपणे आवश्यक आहे.तणाव वाढल्यास पार्टी करणे किंवा मद्यपान करणे हा त्यावर उपाय नाही. त्यापेक्षा कुटुंब आणि मित्रांना वेळ द्या. त्यांच्यासोबत संवाद साधल्यास त्यातून आपले शरीर व मन तणावमुक्त होते

असे ठेवा आपले हृदय तंदुरुस्त

-दररोज व्यायामाची सवय लावा, सातत्य ठेवा

- व्यायाम करण्यापुर्वी तीन ते ५ मिनीट वॉर्मअप करा

- व्यायाम झाल्यानंतर ५ मिनीटे कूल ऑफ करा

- एकाच दिवशी अधिक व्यायाम करु नका

- नियमित ८ तास झोप घ्या

- तणावमुक्तीसाठी आपले छंद जोपासा,त्यासाठी वेळ काढा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.