मुंबई : केंद्र सरकारने गेल्या चार महिन्यांत राज्यात एक लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. मेट्रो प्रकल्पांसाठी १५ हजार कोटींचा निधी मंजूर केल्यामुळे जगातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे मुंबई एमएमआर विभागामध्ये विणले जात असल्याचे शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी सांगितले.