Worli Hit and Run: मिहीर शहाने तीन दिवस फरार राहून केला 'गेम'! पोलिसांना झटका; घटनेला नवे वळण

Worli BMW hit and run case: ७ जुलैच्या सकाळी आरोपी मिहीर शहा याच्या भरधाव BMW ने एका महिलेला चिरडले होते. यात कावेरी नाखवा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
Worli BMW hit and run
Worli BMW hit and run
Updated on

मुंबई- वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. BMW हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहीर शहाची ब्लड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. वैद्यकीय तपासणीत रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल न मिळाल्याने मोठा धक्का बसला आहे. पोलिसांसाठी हा मोठा झटका आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे.

दुर्घटना झाल्यापासून तीन दिवस मिहीर शहा फरार होता. रक्ताची तपासणी करण्यास उशीर झाल्यामुळे ब्लड टेस्टमध्ये अल्कोहोल मिळून न आल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे हा प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. पण, आरोपीचा ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्याला खिळ बसण्याची शक्यता आहे.

Worli BMW hit and run
Hit And Run Case Worli: हिट अँड रनचा आणखी एक बळी! वरळीत 'बीएमडब्ल्यू'च्या धडकेत तरुणाचा मृत्यू

७ जुलैच्या सकाळी आरोपी मिहीर शहा याच्या भरधाव BMW ने एका महिलेला चिरडले होते. यात कावेरी नाखवा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. धडक दिल्यानंतर कावेरी नाखवा यांना १.५ किलोमीटरपर्यंत मिहिर शहाने फरफटत नेलं होतं. चालकाचा देखील या अपघातात समावेश होता. अपघातानंतर आरोपी मिहीर शहा आणि ऋषिराज बिडावत फरार झाले होते.

Worli BMW hit and run
Worli Spa Murder Case: 21 वर्षीय गर्लफ्रेंडनेच केला वाघमारेचा गेम; वरळी स्पा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

मिहीर शहा हा शिंदे गटाचे पालघर जिल्ह्याचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. अपघाताच्या पूर्वसंध्येला मिहीरने जुहू येथील बारमध्ये तसेच गाडीत मद्य प्राशन केल्याचा आरोप आहे. अपघातानंतर ब्लड टेस्ट पॉझिटिव्ह येऊ नये यासाठीच तो तीन दिवस फरार झाल्याचं सांगितलं जात आहे. सदर अपघातानंतर शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

मिहीर शहा याने महिलेला चिरडले होते. त्यानंतर तो आपल्या कुटुंबासोबत फरार झाला होता. त्याला एका रिसॉर्टवर सापळा रचून पोलिसांनी पकडले होते. सध्या तो कोठडीमध्ये आहे. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. कारण, आरोपीने अपघात केल्यानंतर महिलेला जवळपास १ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.