Worli Hit and Run Case: "मित्राचा मोबाईल ट्रेस केला अन् अख्ख कुटुंब..."; मिहीर शाह पोलिसांच्या जाळ्यात कसा सापडला?

Worli Hit and Run Case Update: मुंबई पोलिसांनी मिहीर शाह याच्यासह १२ जणांना अटक केली आहे. या १२ जणांना शहापूर तालुक्यातील माशाअल्ला येथील रिसॉर्टमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
Worli Hit and Run Case Update in marathi
Worli Hit and Run Case Update in marathiesakal
Updated on

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अपघात घडल्यापासून फरार झालेला मिहीर शाह याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिस त्याच्या मागावर राहून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होते आणि अखेर ते यशस्वी झाले.

पोलिसांची कारवाई आणि तपास

मुंबई पोलिसांनी मिहीर शाह याच्यासह १२ जणांना अटक केली आहे. या १२ जणांना शहापूर तालुक्यातील माशाअल्ला येथील रिसॉर्टमधून ताब्यात घेण्यात आले आहे. या अटक करण्यात आलेल्यांमध्ये मिहीरची आई मिनी शाह आणि बहिणी किंजल शहा आणि पूजा शहा यांचा देखील समावेश आहे. या १२ जणांनी मिहीर शाह याला फरार होण्यासाठी मदत केली होती.

मिहीर शाह कसा सापडला?

मिहीर शाह अपघात झाल्यानंतर त्याच्या मैत्रिणीकडे गोरेगावला गेला. तिथे त्याने अपघाताचा सर्व प्रकार मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने ही माहिती मिहीरच्या बहिणीला फोनवरून दिली. मिहीरची बहिण त्याला गोरेगाववरून घेऊन बोरीवलीला गेली आणि तिथून ते सर्व कुटुंब वडिलांच्या मर्सिडीजने शहापुरच्या रिसॉर्टवर गेले.

सीसीटीव्ही फुटेजमुळे मिळाले महत्त्वाचे धागेदोरे-

पोलिसांनी शहापुरच्या रिसॉर्टवर पोहोचण्याआधीच मिहीर शाह आपल्या मित्रासोबत तिथून निघून गेला होता. त्याच्या मित्राचा मोबाईल पोलिसांनी ट्रेसींगवर ठेवला होता. मिहीरचा मित्राने फोन ऑन केला तेव्हा पोलिसांना त्याचे लोकेशन मिळाले आणि त्यांनी त्या परिसरातील हॉटेल आणि फ्लॅटचे सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली.

Worli Hit and Run Case Update in marathi
Jayant Patil: कोरोना काळात मृत व्यक्तीच्या नावावर पैसे काढणारा BJP आमदार कोण? जयंत पाटलांनी केला खळबळजनक आरोप

अटक कशी झाली?

एका हॉटेलच्या सीसीटीव्हीत मिहीर आणि त्याचे मित्र दिसले. पोलिसांनी रिसेप्शनवरून कॉल करून मिहीरला खाली बोलवले आणि त्याला ताब्यात घेतले. शहापुर येथील रिसॉर्टवरून पोलिसांनी मिहीरच्या कुटुंबाला देखील ताब्यात घेतले आहे.

चौकशी चालू-

किंजल शहा (बहिण), पूजा शहा (बहिण), मिनी शहा (आई) आणि अवदीत (मित्र) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची सध्या चौकशी चालू आहे.

Worli Hit and Run Case Update in marathi
Worli Hit and Run: तीन दिवसांनी आरोपीला अटक, मेडिकलमध्ये मद्य प्राशन केलेलं कसं कळणार? वरळी हिट अँड रन'वर मोठा प्रश्न!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.