Worli Hit And Run Case: मिहीर शहाला कोणी मदत केली? निबंध घेऊन जावा लागणार का? 60 तासानंतर अटक झाल्यामुळे ठाकरेंचा संताप

Worli Hit And Run Case Update: या अपघातानंतर पोलिसांनी आरोपीचे वडिल राजेश शाह, आणि ड्रायव्हर राजऋषीला ताब्यात घेतले होते. मात्र सोमवारी संध्याकाळी कोर्टाने १५,००० रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर राजेश शाहला जामीन मंजूर केला.
Worli Hit And Run Case
Worli Hit And Run Caseesakal
Updated on

मुंबईच्या वरळीमध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणात पोलिसांना मोठी यश मिळाली आहे. शहापूर येथून पोलिसांनी मुख्य आरोपी मिहीर शाहला अटक केली आहे. मिहीर शाह हाच तो व्यक्ती आहे. ज्याच्या गाडीच्या धडकेत एक महिलेचा मृत्यू झाला होता. रविवारी सकाळी झालेल्या या अपघातानंतर मिहीर फरार झाला होता आणि त्यानंतर पोलिस त्याच्या शोधात होते. पोलिसांनी सांगितले होते की, मिहीरने पळण्यापूर्वी आपली कार बांद्रात सोडली होती आणि ड्रायव्हर राजऋषीला काला नगरजवळ सोडून गेला होता. त्यानंतर राजऋषी ऑटो-रिक्शाने बोरिवलीला आला होता.

या अपघातानंतर पोलिसांनी आरोपीचे वडिल राजेश शाह, आणि ड्रायव्हर राजऋषीला ताब्यात घेतले होते. मात्र सोमवारी संध्याकाळी कोर्टाने १५,००० रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर राजेश शाहला जामीन मंजूर केला. मिहीर घटनास्थळावरून फरार झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या वडिलांना अटक केली होती, ज्यांनी नंतर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने त्यांना जामीन दिला.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी विचारले की मिहीर शाहला अटकेला उशीर का झाला? त्यांनी सांगितले की, मच्छिमार महिला गंभीरपणे जखमी झाली आणि कारने तिला फरफटत नेले. शिवाय, मिहीर शाहला अटक करण्यात का विलंब झाला यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांवर आरोप-

आदित्य ठाकरे यांनी तीन दिवसांमध्ये अनेक मुद्द्यांवर ताशेरे ओढले. मुख्यमंत्र्यांनी विविध गोष्टींवर कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरीही, मूळ आरोपी मिहीर राजेश शहाच्या अटकेस उशीर का झाला?, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

ठाकरे म्हणाले की, "आमच्याकडे कोळीवाड्यात महिलेला उडवलं, फरफटत नेलं आणि परत गाडीने दुसऱ्यांदा उडवलं. हे भयानक आहे. गृह खातं कार्यरत आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे."

Worli Hit And Run Case
Vladimir Putin: जगातील सर्वात श्रीमंत नेता अशी ओळख असणाऱ्या पुतिन यांची एकूण संपत्ती किती? मोदींच्या तुलनेत किती पगार?

मिहीर शहाच्या अटकेचा प्रश्न-

मिहीर शहाला अटक करण्यात का उशीर झाला, असा प्रश्न उपस्थित करून ठाकरे म्हणाले, "मिहीर शहाला खोके सरकारने का पकडले नाही? किती दिवस लागणार? गृह खातं काय करतंय?" तसेच, त्यांनी गृहमंत्र्यांवर जोरदार टीका केली.

हिट ॲंड रन की मर्डर?

नाकवा जी यांनी हिट ॲंड रन प्रकरणाचे वर्णन करताना म्हटले की, "हे मर्डर आहे. सीसीटीव्ही समोर आलेत, फरफटत नेलं आणि ड्रायव्हर बदलून पुन्हा चिरडण्यात आले." ठाकरे यांनी विचारलं की, "या कारवाईसाठी ६० तास का लागले? कोणी त्यांना मदत करत होते का?" त्यांनी पोलीस खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आणि म्हटले की, "गृह खात काय करतेय, ते का उत्तर देत नाही? आम्हाला निबंध घेऊन जावा लागणार का?

Worli Hit And Run Case
Worli Hit And Run Case: वरळी 'हिट अँड रन' प्रकरणी मोठी घडामोड! फरार मिहीर शहाला अखेर अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.