Worli Hit And Run: वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात

Shiv Sena Eknath Shinde: शहा पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत. असे असले तरी अपघात घडला त्यावेळी त्यांचा मुलगा व ड्रायव्हर गाडीत होते.
Worli Hit And Run
Worli Hit And RunEsakal
Updated on

मुंबईतील वरळीत 'हिट अँड रन'ची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये मच्छी आणण्यासाठी निघालेल्या दांपत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीने पाठीमागून धडक दिली अन् दांपत्याला फरफटत नेलं. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास वरळीतील एट्रिया मॉलजवळ ही घटना घडली. ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला होता.

आता या प्रकरणात पोलिसांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना ताब्यात घेतले आहे. शहा पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत. असे असले तरी अपघात घडला त्यावेळी त्यांचा मुलगा व ड्रायव्हर गाडीत होते. पोलिसांना आरोपी मुलांचाही शोध लागला असून मुलगा व ड्रायव्हर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Worli Hit And Run
Amaravati Central Jail: बॉम्ब की आणखी काही? अमरावती मध्यवर्ती कारागृहात नेमकं काय फेकलं? त्या दोन बॉलमुळे खळबळ

दरम्यान पोलिसांनी वरळी हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी मिहीर शहा याच्या ड्राइव्हरलाही ताब्यात घेतले आहे. तसेच मिहीर शहा या घटने नंतर गोरेगाव येथे गेला होता अशी माहिती समोरआली आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत गोरेगावला थांबल्यानंतर त्याने आपल्या मैत्रिणिच्या घरी जातोय असे सांगितले होते. आता त्याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

वरळी येथील कोळीवाडा परिसरात राहणारे दाम्पत्य आज सकाळी मासे खरेदी करण्यासाठी गेले होते. मासे घेऊन परतत असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून चारचाकीने धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने, पत्नीचा मृत्यू झाला, तर तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत.

Worli Hit And Run
Girish Mahajan Audio Clip : धनगर उपोषणकर्त्यांबद्दल गिरीश महाजन काय म्हणाले? रमेश कराड यांच्यासोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल...

यापूर्वी पुण्यातून हीट अँड रनचे प्रकरण समोर आले होते. एका अल्पवयीन मुलाने पोर्श कारने दोघांना चिरडून ठार केले होते. या अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण आणि तरुणी दोघेही 24 वर्षांचे होते व ते एका आयटी कंपनीत कामाला होते.

या प्रकरणात न्यायालयीन निबंध लिहून आरोपीची सुटका करण्यात आली. 18-19 मे च्या रात्री झालेल्या अपघातानंतर बाल मंडळाने 300 शब्दांचा निबंध लिहिण्यासह एकूण 7 अटींवर आरोपींना जामीन मंजूर केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.