मुंबई : वरळी ते नरीमन पॉईंट या सागरी किनारी मार्गावरुन (Sea side road) सुसाट प्रवास करण्याची प्रतिक्षा लांबली आहे. 2024 मध्येच या मार्गावरुन आता 12 ते 13 मिनीटात वरळी ते नरीमन पॉईंट (Worli to nariman Point) पर्यंतचा प्रवास करता येणार आहे. सागरी किनारी मार्गाचे कामे ऑक्टोबर 2018 मध्ये प्रत्यक्ष सुरु करण्यात आले. हे काम 2022 च्या अखेर पर्यंत पूर्ण होऊन 2023 मध्ये वाहतूक सुरु करण्याचे महानगरपालिकेचे (BMC) ध्येय होते. मात्र,न्यायालयीन लढे,आक्षेप विरोध यामुळे या कामात काही अडथळे आले. ( Worli to Nariman point road traveling in 2024 year- nss91)
काम रखडल्याने महानगर पालिकेने काही शे-कोटी रुपयांचा आर्थिक फटकाही सहन करावा लागला होता. हे अडथळे दुर झाल्यानंतर कोविडच्या पहिल्या लाटेमुळे सुरवातीचे काही महिने मोठ्या प्रमाणावर कामावर परीणाम झाला.गेल्या वर्षापर्यंत हे काम जुलै 2023 पर्यंत पुर्ण होण्याची अपेक्षा होती.मात्र, आता हा मार्ग 2023 च्या अखेर पर्यंत बांधकाम पुर्ण होण्याची अपेक्षा आहे.त्यामुळे प्रत्यक्ष वाहतुक सुरु होण्यासाठी 2024 उजाडण्याचा अंदाज आहे. 12 हजार 721 कोटी रुपयांचा खर्च करुन 10.58 किलोमिटर लांबीचा मार्ग पालिका उभारत आहे.यामुळे इंधनाचीही मोठ्या प्रमाणात बचत होणार असून मार्ग टोल मुक्त असल्याने वाहान मालांनाही अतिरीक्त भुर्दंड बसणार नाही असा दावाही केला जात आहे.
लोकसभा विधानसभा निवडणुकीत ठरणार महत्वाचा
आगामी लोकसभा निवडणुक एप्रिल मे 2024 मध्ये होणार आहे.त्यानंतर राज्याच्या विधानसभेची निवडणुक होणार आहे.या दोन्ही निवडणुकांमध्ये किनारी मार्गाचा प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे.भाजप आणि शिवसेने मध्ये या प्रकल्पाच्या श्रेयावरुन चढाओढ होण्याची शक्यता आहे.तर,दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसच्या काळात या मार्गाचा विचार पुढे आल्याने कॉंग्रेसही या स्पर्धेत मागे राहाणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.