Mumbai Latest Update: मुंबईरांचे लक्ष लागलेला वरळी मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यामुळे चर्चेत आहे. या मतदार शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव निश्चित झाले असून आता त्यांच्या विरोधात भाजपा तुल्यबळ उमेदवार देण्याचा तयारीत आहे. येथून भाजपाच्या नेत्या शायना एन. सी. आणि मनसेचे नेते संदिप देशपांडे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे वरळीत तिरंगी लढतीची शक्यता आहे.
येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. मुंबईतील सर्वच मतदार संघात सद्या जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. हा मतदार संघ आदित्य ठाकरे यांच्यामुळे महत्वाचा ठरला असून त्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.