Devendra Fadanvis: 'एक्स'वर केली फडणवीसांची चुकीची पोस्ट, कल्याणात तक्रार दाखल

Thane News: राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Esakal
Updated on

Dombivali: राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्ती विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एक्सपोस्टवर काही चित्र प्रदर्शित केल्याप्रकरणी ही तक्रार असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis : जयंत पाटलांचा फडणवीसांवर निशाणा, म्हणाले तुमचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ भ्रष्टाचाराचे....

खडकपाडा पोलिसांनी या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून गजाभाऊ या नावाने एक्सवर (टि्वटर) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करणाऱ्या इसमा विरुध्द बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. प्रथमेश अनंत पाटील असे तक्रारादाराचे नाव आहे. तो अटाळी आंबीवली भागात राहतो. पोलीसांनी सांगितले, गजाभाऊ या एक्स (टि्वटर) खात्यावर

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम? दिल्लीला रवाना, मोदी-शहांची घेणार भेट!

चित्रपटातील खलनायकांच्या चेहऱ्यावर गृहमंत्री फडणवीस यांची प्रतिमा लावून ते झळकविण्यात आले आहेत. तसेच इतर देखील काही पोस्ट आहेत.

ज्याद्वारे फडणवीसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. गजाभाऊ या एक्स खात्यावरून ही बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे खडकपाडा पोलिसांनी या खात्याच्या वापरकर्त्याविरुध्द गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis: पराभवाची जबाबदारी सामूहिक, निर्णय मागे घ्या, आपल्या मार्गदर्शनाची गरज!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.