Uran Murder Case: उरणमध्ये यशश्रीच्या हत्येपूर्वीचा CCTV समोर, दाऊद शेख पाठलाग करताना कैद!

Uran Murder Case Video : उरणमध्ये 20 वर्षीय यशश्री शिंदेची निर्घृण हत्या झाली होती. तिचे अवयव देखील कापण्यात आले होते. उरणमधील वातावरण या घटनेमुळे ताणलेले आहे.
Uran Murder Case
Uran Murder Case esakal
Updated on

उरणमध्ये यशश्री शिंदे हत्येप्रकरणात नवीन पुरावे समोर आले आहेत. यामध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दाऊद शेख यशश्रीचा पाठलाग करताना कैद झाला आहे. यामुळे या प्रकरणात नवीन वळण लागले आहे.

कर्नाटकमधून एकाला अटक-

या घटनेतील आणखी एक महत्वाची माहिती म्हणजे कर्नाटकमधून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. उरणमध्ये 20 वर्षीय यशश्री शिंदेची निर्घृण हत्या झाली होती. तिचे अवयव देखील कापण्यात आले होते. उरणमधील वातावरण या घटनेमुळे ताणलेले आहे.

दाऊद शेखवर संशय

यशश्री शिंदेच्या हत्येप्रकरणात पोलिसांना दाऊद शेखवर संशय आहे. पोलिसांच्या मते, दाऊद शेखनेच तिची हत्या केली आहे. पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांमुळे हे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे.

2019 मधील पोक्सो केस-

यशश्री शिंदे आणि तिच्या कुटुंबाने 2019 मध्ये दाऊद शेखवर पोक्सो कायद्याखाली एफआयआर दाखल केला होता. त्यावेळी यशश्री अल्पवयीन होती, तिचे वय 14-15 वर्ष होते. दाऊद शेखला या प्रकरणात तुरुंगात जावे लागले होते. ही माहिती समोर आल्याने पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली आहे.

Uran Murder Case
Uran Murder Case: उरण हत्याकांडात मोठी अपडेट! २०१९ मध्ये पीडितेच्या वडिलांनी संशयितावर केला होता हल्ला

कॉल रिकॉर्डमध्ये खुलासा-

यशश्री 25 जुलैला गायब झाली होती. तिच्या कॉल रिकॉर्डमधून पोलिसांना एक नंबर सापडला जिच्यावर तीने दीर्घकाळ संवाद साधला होता. या नंबरची चौकशी केल्यावर तो नंबर दाऊद शेखचा असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पोलिसांनी दाऊद शेखचा शोध सुरु केला.

दाऊद शेखचा फोन यशश्री गायब झाल्यापासून बंद होता आणि त्याचा कुठलाही मागोवा पोलिसांना लागलेला नाही. यामुळे उरणमध्ये या प्रकरणामुळे तणावाचे वातावरण आहे.

Uran Murder Case
यशश्री हत्याप्रकरणी लव जिहाद पोलिसांनी फेटाळला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.