Janta curfew To Lockdown: वर्षापूर्वींचा जनता कर्फ्यू, काय घडलं होतं मुंबईच्या इतिहासात, वाचा सविस्तर

Janta curfew To Lockdown: वर्षापूर्वींचा जनता कर्फ्यू, काय घडलं होतं मुंबईच्या इतिहासात, वाचा सविस्तर
Updated on

मुंबई: कोविडच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी 14 तासांचा जनता कर्फ्यू जाहीर केला. या जनता कर्फ्यूचे नागरिकांनीही स्वागत होते. मात्र ही लॉकडाऊनची पहिली पायरी होती. 23 मार्च पासून मुंबईत लॉकडाऊनला सुरुवात झाली. सुरुवातीचे तीन चार दिवस सर्वांनी संयम पाळला. पण नंतर बांध फुटू लागला. पहिली झळ बसली ती स्थलांतरित कामगारांना त्यानंतर लहान मोठ्या नोकऱ्या करुन पोट भरणाऱ्या कष्टकरी नोकरदारांना. या काळात मुंबईच्या इतिहातातील सर्वात मोठे विस्थापन घडून आले होते. स्थलांतरित कामगारांसह त्यांच्या कुटूंबियांच्या स्थलांतराचा आकडा 15 लाखांहून अधिक असू शकतो. या काळात नेहमी प्रमाणे मुंबईचे स्पिरीट दिसून आले. हजारो घरात बंद पडलेल्या चुली पेटवण्यासाठी सामान्यतला सामान्य नागरिक पुढे आला. जून महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये शिथीलता येऊ लागली. मात्र,आता पुन्हा कोविडचे रुग्ण वाढू लागल्याने मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभी आहे.

लॉकडाऊनचा पहिला फटका बसला तो स्थलांतरित कामगारांना. आठवडाभर परिस्थितीचा अंदाज घेऊन हजारो स्थलांतरित कामगार पायीच त्यांच्या मूळगावाकडे निघाले. त्यांची गणनाच झालेली नाही. शेकडो मैल चालत मिळत ते खात फाटलेल्या पायांनी त्यांनी हा प्रवास सुरु केला. काही दिवसांनी विशेष ट्रेन्स सुरु केल्या. संपूर्ण महाराष्ट्रातून 12 लाखांच्या आसपास श्रमिक त्यांच्या गावाकडे ट्रेनने रवाना झाले होते. त्यात मुंबईतून जाणारे निम्म्याच्या आसपास होते. मात्र,ट्रेन व्यतिरिक्त चालत, रिक्षा टॅक्‍सी घेऊन, खासगी वाहनांनी जाणाऱ्यांची संख्याही त्याहून अधिक होती. हे स्थलांतर फक्त परराज्यात झाले नाही. तर लहान मोठी नोकरी करुन मुंबईच पोट भरणाऱ्या मराठी माणसांचेही स्थलांतर दिड ते दोन लाखांच्या पुढे होते.

मुंबईत राहिले त्यांचे हाल संपले नव्हते. रोजगार पुन्हा कधी सुरु होईल हे समजत नव्हते. मालकही विचारत नव्हता. अशा वेळी दोन वेळच्या अन्नाचेही वांदे झाले. महानगर पालिका या काळात तीन ते चार लाखांहून अधिक स्थलांतरित कामगारांना अन्न पुरवले. या अन्नाचा खर्च 120 कोटींहून अधिक खर्च केला आहे. तर, या काळात सामान्य नागरिकही पुढे आला. अनेक संस्थांनी रोजगार गेलेल्यांना अन्नापासून रोजच्या जीवनवाश्‍यक वस्तुंची पुरवठा सुरु ठेवला. मे महिन्यापर्यंत मुंबईत अशीच परिस्थिती होती. जून महिन्यापासून अनलॉक होण्यास सुरुवात झाली. मात्र पहिल्यांदाच मुंबईत तीन महिन्यांहून अधिक काळ लोकल पूर्ण पणे बंद होती. ठराविक वेळेतच जीवनावश्‍यक वस्तुंची दुकाने सुरु होत होती.
 
पांढरपेश्‍यांनाही झळ

या लॉकडाऊनचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. पांढरपेशी नोकरदारांनाही याचा फटका बसलाच. काही अपवाद वगळता सर्वच क्षेत्रात वेतन कपात झाली.अनेक क्षेत्रांचे वेतन आजही पूर्ववत झालेले नाही. साठवून ठेवलेल्या पैशांवर या काळात नोकरदारांनी गुजराण केली. हा खड्डा आजही भरला गेलेले नाही.

दिवस जात होत तसे स्थलांतरित कामगारांचा संयम संपत होता. कोठून तरी गावी जाण्याची सोय होईल या आशेवर सर्व होते.अशातच एक मेसेज व्हायरल झाला. हजारो स्थलांतरित कामगार 15 एप्रिल रोजी वांद्रे स्थानका जवळ जमले. हा जमाव पांगावण्यासाठी पोलिसांना अखेरीस लाठीचार्जही करावा लागला होता.
 
नैसर्गिक विधीचीही अडचण

हे स्थलांतरित कामगार प्रामुख्याने वस्त्यांमध्ये राहाणारे. तेथे पैसे द्या आणि वापरा या तत्वावर त्यांना सार्वजनिक शौचालय वापरावे लागते. मात्र कामच बंद असल्याने रोजचे पैसे खर्च करणेही शक्‍य होत नव्हते. त्याच बरोबर पैसे भरता न आल्याने अनेक कामगारांचे मोबाईलही बंद पडले होते. अखेरीस हे शौचालय मोफत करण्याचा निर्णय महानगर पालिकेला घ्यावा लागला.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

A year ago on this day janta Curfew mumbai lockdown

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.