येसबँक डीएचएफएल प्रकरण : इडीकडून 415 कोटीच्या मालमत्तांवर टाच

अविनाश भोसले यांची 164 कोटीची तर आरोपी संजय छाब्रिया यांची 251 कोटीची मालमत्ता इडीने बुधवारी जप्त केली
Yes bank DHFL case 415 crore assets seized by ED mumbai
Yes bank DHFL case 415 crore assets seized by ED mumbaiSakal
Updated on

मुंबई : येस बँक डीएचएफएल प्रकरणात इडीने कारवाई करत 415 कोटी रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. या प्रकरणात आरोपी अविनाश भोसले यांची 164 कोटीची तर आरोपी संजय छाब्रिया यांची 251 कोटीची मालमत्ता इडीने बुधवारी जप्त केली आहे.रेडियस डेव्हलपर्सचे संजय छाब्रिया आणि एबीआयएल इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक अविनाश भोसले यांना यापूर्वी येस बँक-डीएचएफएल प्रकरणात अटक करण्यात आली होती.सीबीआयने गेल्या आठवड्यात अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टर पुण्यात जप्त केले होते.

तपास यंत्रणांनी या प्रकरणात आरोपी संजय छाब्रिया यांची सांताक्रूझ येथील जमीन आणि 3 कोटी रुपयांचा फ्लॅट, बेंगळुरू येथील 115 कोटी रुपयांची जामीन तसेच 3 कोटीच्या 3 महागड्या गाड्या आता पर्यंतच्या कारवाईत जप्त केल्या आहेत. या प्रकरणात आरोपी अविनाश भोसले यांच्या मुंबईतील ड्यूप्लेक्स फ्लॅट, पुण्यातील 14 कोटींची जमिन , नागपूर येथील 2 कोटीची जामीन या मालमत्तांवर या पूर्वी तपास यंत्रणांनी टाच आणली आहे.या मालमत्तांसह एकूण 1,827 कोटी रुपयांची संपत्ती इडी ने जप्त केली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर आणि डीएचएफएल चे प्रवर्तक कपिल वाधवान आणि धीरज वाधवन यांनी केलेल्या कथित घोटाळ्याच्या प्रकरणात तपास करत आहे. राणा कपूर यांनी कपिल वाधवन आणि इतरांसोबत येस बँकेच्या माध्यमातून डीएचएफएल ला आर्थिक फायदा देण्यासाठी बँकाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यांच्याकडे असलेल्या कंपन्यांद्वारे स्वतःला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक फायदा करून दिल्याचा आरोपी केंद्रीय तपास यंत्रणांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()