Viral Video: माउलीच्या कष्टाचं झालं चीज! रस्त्यावर भाजीविक्री करून मुलाला बनविलं 'CA'; योगेशनं आईला मिठी मारली अन् डोळ्यातून पाणी..

Dombivli CA Viral Video: आई ही आपल्या मुलांसाठी कोणतीही कठिण परिस्थिती, संकटाचा सामना करून त्यांना मोठे करत असते.
CA yogesh Thombre viral video success story
CA yogesh Thombre viral video success storyesakal
Updated on
Summary

माझी काळजी करु नकोस, योगेश आपल्या आईला नेहमी सांगत असे. अखेर सीए परीक्षेत यशस्वी होत योगेशनेही आईच्या कष्टाचे चीज केले आहे.

डोंबिवली : आई ही आपल्या मुलांसाठी कोणतीही कठिण परिस्थिती, संकटाचा सामना करून त्यांना मोठे करत असते. मुलाने देखील आपल्या आईच्या कष्टाची जाण ठेवून सीएची परीक्षा (CA Exam) पास होत आईचे स्वप्न पूर्ण केले आहे. मुलाने मिळविलेल्या यशामुळे त्याच्या माउलीचे कौतुक रस्त्याने येणारा-जाणारा प्रत्येक नागरिक करत आहे. कारण, ही माऊली तशी वेगळीच आहे.

रस्त्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय करून नीरा ठोंबरे (Neera Thombre) यांनी आपला मुलगा योगेश याला शिकविले असून आज तो सीए झाला आहे. कल्याण तालुक्यातील खोणी गावात (Khoni Village in Kalyan) ठोंबरे कुटुंब राहण्यास आहे. नीरा ठोंबरे यांचे वयाच्या 14 व्या वर्षीच लग्न झाले. त्यांना 2 मुले व 1 मुलगी आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने नीरा या भाजी विक्रीचा व्यवसाय करून संसारात पतीला हातभार लावत होत्या

CA yogesh Thombre viral video success story
Koli Community : दर्याचा राजा निघाला देवदर्शनाला..; मच्छीमारी बंद असल्याने कोळी बांधवांची पर्यटनाला पसंती

मात्र, 20 - 22 वर्षापूर्वी पतीची तब्येत बिघडली आणि त्यांचे आकस्मित निधन झाले. तेव्हापासून संसार आणि 3 मुलांची जबाबदारी नीरा यांच्या खांद्यावर आली. तरीही त्या डगमगल्या नाही. अनेक अडचणींचा सामना करुन कठीण परिस्थिती मध्येही त्यांनी 3 ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले. मोठा मुलगा व मुलीचे लग्न लावून दिले. लहान मुलगा योगेश हा पहिल्या पासून अभ्यासात हुशार असल्याने त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्या दिवसरात्र झटत होत्या.

डोंबिवलीतील गांधीनगर येथील चौकात त्या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. खोणी गावातून पहाटेच उठून बाजारात जातात. तेथून भाजीपाला विकत घेऊन त्याची डोंबिवलीत विक्री करतात. मुलाचे शिक्षण व बाकी जबाबदारी असल्याने एकही दिवस त्यांनी त्यांच्या भाजी विक्रीच्या कामात खंड पडू दिलेला नाही, असे त्या सांगतात. उधारीवर मुलांची वह्या पुस्तके घेतली आहेत. कधी भाजी विक्री जास्त होऊन धंदा जास्त झाला की, मग मी ती उधारी चुकती करत असे असंही नीरा सांगतात.

Yogesh Thombre Success Story
Yogesh Thombre Success Storyesakal

योगेश सीए झाल्यानंतर त्याने ही खुश खबरी सांगायला आईच्या कामाच्या ठिकाणी गेला. आईला त्याने यावेळी साडी घेतली होती. ते पाहून आई समजली की योगेश पास झाला. त्यावेळी माझ्या डोळ्यासमोरून सगळे दिवस भरभर सरले. हा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, पण जीवनाचे सार्थक झाले ही भावना मनात आहे. माझ्या कष्टाचे चीज झाले आहे अजून एका आईला काय हवे असते. पहिले कोणी आमची विचारपूस पण करत नव्हते.

आता थांबून थांबून माझे अभिनंदन करत आहेत. यातच सगळं आले असे नीरा सांगतात. मुलाचे शिक्षण पूर्ण झाले आहे. तो नोकरी पण करतोय, पण मी माझा भाजीचा व्यवसाय सुरू ठेवणार आहे. या व्यवसायानेच आम्हाला सर्व काही दिले आहे. आज हे दिवस आम्हाला याच माझ्या व्यवसायामुळे दिसले आहेत. मुलं सांगतील तेव्हा व्यवसाय बंद करेल, पण होते तेवढे दिवस करेल असेही त्या सांगतात.

CA yogesh Thombre viral video success story
मोठी बातमी! शिक्षणात मराठा आरक्षण नसल्यामुळं 18 वर्षाच्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन

माझी काळजी करु नकोस, योगेश आपल्या आईला नेहमी सांगत असे. अखेर सीए परीक्षेत यशस्वी होत योगेशनेही आईच्या कष्टाचे चीज केले आहे. सीए झालेल्या योगेशने आईला साडी आणली होती. तिला घट्ट मिठी मारली. दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थित असलेले सर्वजण भारावले. याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सर्व स्तरातून होत आहे.

आगरी समाजातील योगेशनं आईचं स्वप्न केलं पूर्ण

शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी खोनी गावात ठोंबरे यांच्या घरी जाऊन योगेश याचे अभिनंदन केले. यावेळी संतोष चव्हाण, गजानन व्यापारी, उमेश चव्हाण यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सीएची परीक्षा ही कठीण परीक्षा असते. आगरी समाजातील योगेशने आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत हे यश मिळविले आहे. यापुढे त्याला कोणतीही मदत लागली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यातून ती केली जाईल, असेही यावेळी डोंबिवली शहर प्रमुख मोरे यांनी सांगितले.

''आज आईसाठीच मी CA परीक्षा पास झालो''

माझ्या आईचे स्वप्न होते की, माझा मुलगा सीए व्हावा. यासाठी ती कष्ट घेत होती आणि आज तिच्यासाठीच मी ही परीक्षा पास झालो आहे, अशी भावना योगेशने व्यक्त केली. दरम्यान, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील या विद्यार्थ्याचा CA झाल्यानंतर बाजारपेठेत आईला भेटतानाचा व्हिडिओ शेअर करुन कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.