मुंबईत तरुण वर्गाला कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग होत आहे. लॉकडाउन शिथील झाल्यापासून आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर सुरु केल्यापासून युवा वर्गाला कोरोनाची मोठ्या प्रमाणावर बाधा होत आहे, असे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. या वर्गामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असूनही आजाराची लक्षण दिसत नाहीत, किंवा दिसलीच तर सौम्य लक्षणे दिसतात. हा युवा वर्गच कोरोना सुपर स्प्रेडर ठरत असून त्यांच्यापासून वृद्धांना कोरोनाची बाधा होत आहे. याच वर्गाला कोरोनापासून गंभीर धोका आहे. मुंबई महापालिकेच्या डाटानुसार, ३० ते ४९ वयोगटातील नागरिकांना सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग होत आहे. याच वयोगटातील आतापर्यंत दीड लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
५० ते ६९ वयोगटाला कोरोनापासून सर्वाधिक धोका आहे. या वयोगटातील नागरिक विविध व्याधींनी ग्रस्त असतात. ५० ते ६९ वयोगटात १ लाख २८ हजार नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या मुंबईत झपाट्याने वाढतेय. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यांनी बाहेर प्रवास करणे टाळले पाहिजे. युवा वर्गापेक्षा ज्येष्ठ नागरिक कोरोना नियमांचे जास्त काळजीपूर्वक पालन करतात, असे निरीक्षण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे. युवा वर्गा नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने जास्त घराबाहेर पडतो, त्यामुळे हा वर्ग कोरोनाच्या प्रसारास कारणीभूत ठरतोय.
युवा वर्गाला कोरोना झाला, तरी त्याची लक्षणे सौम्य दिसतात. ते चांगलं आहे. पण तरुणाई ज्येष्ठांसोबत राहते. त्यामुळे त्यांच्यापासून वुद्धांपर्यंत कोरोना पसरतो. आतापर्यंत कोरोनाच्या साथीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक मृत्यू झाला आहे याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले.
बीएमसीच्या आकडेवारीनुसार, तरुणांपेक्षा वुद्धांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी आहे. पण मृत्यूदर जास्त आहे. आतापर्यंत ५० ते ६९ वयोगटातील ५,८५० नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तेच ३० ते ४९ वयोगटातील १,४२८ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.