Malang Gad River : मलंगगडच्या नदी पात्रात हुल्लडबाजांचा जीवघेणा प्रवास

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून उगम पावणाऱ्या मलंगगडच्या नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
Dangerous Journey
Dangerous JourneySakal
Updated on

अंबरनाथ - सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून उगम पावणाऱ्या मलंगगडच्या नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दरम्यान निर्सगाचा आनंद घेण्यासाठी आलेले पाच तरुण खरड येथील बंधाऱ्याजवळ अडकले होते.

मात्र दैव बलवत्तर म्हणून अडकलेल्या या पाच तरुणांचा जीव वाचला आहे.मागच्यावर्षी पावसात मलंगगड परिसरात 11 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.मात्र मुसळधार पावसात पर्यटकांना अटकाव घालणार कोण असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

मलंगगडच्या नदी पात्रात दरवर्षी पाण्यात बुडून जीव जाणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. या पर्यटकांना अटकाव घालण्यासाठी पोलिसांकडून देखील मज्जाव केला जात असतो. मात्र पोलिसांचे मनाई आदेश आणि जिल्हा प्रशासनाने आदेश धुडकावून पर्यटक मलंगगड भागात जात असतात.

शुक्रवारी खरड येथील बंधारा पार करून तरुण ढोके गावाच्या दिशेने मोकळ्या मैदानावर निसर्गाचा आनंद घेत होते. मात्र डोंगर माथ्यावर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पाच तरुण अडकून बसले होते. त्या परिसरात त्यांना वाचवण्यासाठी देखील कोणी उपस्थित नव्हते.

अखेर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाण्याची पातळी वाढत असल्याचे तरुणांच्या निदर्शनास येताच त्यांनी पाच जनांची साखळी तयार करून घरचा परतीचा मार्ग अवलंबला होता. सुदैवाणे त्यांचा हा प्रवास सुखकर झाला आणि त्यांचे जीव वाचले आहे. मात्र वारंवार स्थानिकांनी आवाहन करून सुद्धा पर्यटक केलं मालंगगड भागातील डोंगराळ भागात आणि नदी पात्रात जात आहेत.

मात्र या नदी पात्रातील प्रवास हा धोकादायक असल्याने पर्यटकांनी नदी पात्रात जाऊ नये असे आवाहन स्थानिक करत आहेत. ज्या परिसरात हे तरुण अडकले होते त्या परिसरात दरवर्षी तरुणांचे पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मलंगगड भागात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी जीवाची काळजी घेणं गरजेचं झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.