Raigad: तमिळनाडूतील तरुण कीर्तनकार ‘ज्ञानोत्तर भक्ती’वर व्याख्यान देणार; इंग्रजीतुन ज्ञानोबा-तुकोबांचे विचार आता ‘ऑक्सफर्ड’मध्ये

साडेसातशे वर्षांपूर्वी वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार संत नामदेव महाराजांनी पंजाबपर्यंत केला. त्यानंतरच्या काळात वारकरी सांप्रदायिक तत्त्वज्ञान अनेक भाषकांपर्यंत पोहोचले.
Sant Tukaram Maharaj
Sant Tukaram MaharajSakal
Updated on

‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी,’ अशी महती असलेल्या वारकरी संप्रदायाने समाजाला नेहमीच दिशा दिली आहे. सध्या वारकरी तरुणही कीर्तनातून महाराष्ट्राबाहेर संतविचार पोहोचवताना दिसतात.

तमिळनाडूमधील एक तरुण वारकरी संत विचाराचा अभ्यास करून, तो ठेवा थेट लंडनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये पोहोचवणार आहे. रघुनाथदास महाराज असे त्यांचे नाव आहे. ‘वारकरी संप्रदाय आणि ज्ञानोत्तर भक्ती’ या विषयावर ते सोमवारी (ता. २७) व्याख्यान देणार आहेत.

साडेसातशे वर्षांपूर्वी वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार संत नामदेव महाराजांनी पंजाबपर्यंत केला. त्यानंतरच्या काळात वारकरी सांप्रदायिक तत्त्वज्ञान अनेक भाषकांपर्यंत पोहोचले. त्यामध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगण, तमिळनाडू,

Sant Tukaram Maharaj
Mumbai News : मुंबईत ऑन ड्यूटी पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या...

गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. अनेक कीर्तनकारांनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचे विचार अन्य राज्यांत नेले. सध्याही अनेक राज्यांमध्ये उच्चशिक्षित कीर्तनकारांची व्याख्याने होतात.

ग्रंथांचे तमीळ भाषांतरण

तमिळनाडूमधील तुकाराम गणपती महाराज हे पंढरीच्या वारीच्या निमित्ताने ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांच्या संपर्कात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदायाचे काम तमिळनाडूमध्ये सुरू केले.

तेथे त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत गेला. त्यानंतरच्या काळात चेन्नई, कोइमतूर, कडईनल्लूर या शहरांमध्ये येथील तमीळ वारकऱ्यांसाठी सातारकर महाराजांनी इंग्रजीमध्ये कीर्तने केली. त्याचा मोठा प्रभाव तमिळनाडूमध्ये पडला.

तेव्हापासून त्या भागात मोठ्या प्रमाणात ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा पारायणे, एकनाथी भागवत कथेचे कार्यक्रम होऊ लागले आहेत.

तमीळ भाविकांना भाषेचा अडसर येत असल्याने तुकाराम गणपती यांचे चिरंजीव रघुनाथदास महाराज यांनी अनेक वारकरी सांप्रदायिक ग्रंथ तमीळ भाषेत अनुवादित केले. त्यामुळे तमीळ भाविक अभंगांचा उच्चार मराठी करतात; मात्र त्याचा अर्थ त्यांना तमीळ भाषेत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Sant Tukaram Maharaj
Mumbai: कल्याण कोळसेवाडी पोलिस ठाण्यात एकाच्या मृत्यूने खळबळ

परदेशातील भाविकांसाठी प्रवचने

वारकरी संप्रदायावर प्रेम करणाऱ्या तमीळ भाविकांसाठी रघुनाथदास महाराज यांनी दहा वर्षांपासून ज्ञानेश्वरीवर इंग्रजीत प्रवचने देण्यास सुरुवात केली.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेले विचार हे वैश्विक आहे. त्यामुळे ते जगाच्या कल्याणासाठी निश्चित उपयुक्त आहेत. संतांची कृपा आणि वडील तुकाराम गणपती महाराज आणि गुरू बाबामहाराज सातारकर यांच्या मार्गदर्शनामुळेच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्यान देण्याची संधी मिळाली आहे.

- रघुनाथदास महाराज, कीर्तनकार, तमिळनाडू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()