मुंबई : देशभरात नपुर शर्मा तसेच उदयपूर येथील कन्हैयालाल यांची झालेली हत्या या मुद्द्यांवर वातावरण तापलेल आहे. राजस्थान नंतर आता महाराष्ट्रात हत्येचे प्रकरण समोर आले जेव्हा 21 जूनला उमेश कोल्हे नावाच्या एका औषध विक्रेत्याची हत्या करण्यात आली. नुपूर संदर्भात कथित पोस्ट शेअर केल्याबद्दल ही हत्या झाली असा तपास यंत्रणांचा दावा आहे. आता मुंबईत सुद्धा याचे पडसाद उमटत आहेत. राजस्थान मधील उदयपूर येथील कन्हैया लाल च्या हत्याबाबत फेसबुक पोस्ट केल्याने मुंबईतील गोरेगाव येथील 16 वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात बुधवारी वी पी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वी पी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार "एका सोळा वर्षे तरुणीला एक इंटरनेट कॉल आला होता आणि या कॉलवर तरुणीला धमकी देण्यात आली. पोलीसानी याप्रकरणी एफ आय आर दाखल केलेला आहे आणि हा कॉल कुठून आला यासंदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत" दक्षिण मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असलेल्या तरुणीने तिच्या फेसबुक वॉलवर कन्हैया लालच्या हत्येबाबत काही मत व्यक्त केली होती. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने तिला व्हॉट्सअॅप कॉल केला आणि पोस्टमध्ये व्यक्त केलेल्या मताबद्दल तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरुद्ध जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.