वाशी : आकर्षक दंड, पिळदार शरीरयष्टी (Body Building) प्रत्येकाला आवडतो. यासाठी जिममध्ये (Gym Exercise) जाऊन पिळदार शरीरयष्टी बनवण्याकडे अनेकांचा कल असतो. भारदस्त शरीरामुळे व्यक्तिमत्व प्रभावी होते. तासनतास जिममध्ये व्यायाम करणारेही खूप आहेत. काही जण मसल्स वाढवण्याच्या गोळ्या घेतात. आयकॉनिक अभिनेत्याची स्टाईल आत्मसात करण्यासाठी तर तरुणाई (youngsters bodybuilding craze) नवनवीन फंड्यांचा वापर करत आहेत.
धकाधकीच्या जीवनात अनेकांना आपल्या शरीराकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळेच काही वर्षांपासून शहरी भागात 'जिम इंडस्ट्री' जोर धरू लागली आहे. त्यातही प्रामुख्याने तरुणाईचे 'जिम'ला जाण्याचा कल वाढले आहे. यासाठी शहरातील विविध भागांत आधुनिक व्यायाम साहित्य असणाऱ्या सुसज्ज जिम सुरू झाल्या आहेत. कमी कालावधीत तरुणाईला पिळदार शरीर हवे. त्यामुळे अव्वाच्या सव्वा शुल्क भरून पहाटे व रात्री उशिरापर्यंत जिमला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
त्यातच एखाद्या अभिनेत्याने चित्रपटात कोणती स्टाइल मारली की, त्याची क्रेझ तरुणाईवर पडते. सध्या बॉलिवूडमध्ये सिक्स पॅक अॅब्ज बनवण्याची स्टाइल जवळजवळ सर्वच हिरोंनी आत्मसात केलेली आहे. तसेच अभिनेत्यांना आपला आयकॉन मानणाऱ्या युवकांची संख्याही कमी नाही. त्यामुळेच सध्या तरुणाईवरही सिक्स पॅकची क्रेझ वाढत आहे. त्यासाठी ते सकाळी लवकर उठून जीममध्ये जाऊन कसरत करताना दिसत आहेत. बॉडी बनवण्यासाठी नवनवीन फंड्यांचा वापर केला जात आहे.
उन्हाळ्यातही जीम फुल
जीममध्ये जाऊन व्यायाम करण्याचा काळ म्हणजे हिवाळा असाच समज सर्वसामान्यांचा असतो. परंतु, आताचा तरुण फिटनेसवर अधिक लक्ष देताना दिसत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही जीममध्ये येणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढ होत आहे. हे युवक तासन् तास व्यायाम करत असतात. कोरोनामध्ये जीम बंद केल्यानंतरही तरुणाई घरीच व्यायाम करत होती. जीम कधी सुरू होईल, याकडेच लक्ष ठेऊन होते.
बॉलीवूड स्टार्सची कॉपी
बॉलीवूडमध्ये सध्या सिक्स पॅक अॅब्जची स्टाइल असल्याकारणाने महाविद्यालयीन तरुण याकडे आकर्षित होत आहेत. बॉलीवूडमधील सलमान खान, अजय देवगण, हृतिक रोशन यांच्याबरोबरच आता टायगर श्रॉफ, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, रणवीर सिंग यांनीही आपल्या बॉडीबिल्डिंगवरच भर दिला आहे. यांची स्टाइल म्हणून तरुणांचा कल पिळदार शरीरयष्टी बनवण्याकडे अधिक आहे.
व्हॉट्सअॅप, पुस्तकांचाही आधार
सिक्स पॅक अॅब्ज बनवण्यासाठी व्हॉट्सअॅपवर अनेक व्हिडीओ येत असतात. ते व्हिडीओ डाऊनलोड करून अनेक युवक घरीच व्यायाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच बाजारात बॉडीबिल्डिंग गाइडन्स करणारी अनेक पुस्तकेही उपलब्ध आहेत. मात्र, तरीही प्रत्यक्ष मार्गदर्शकाशिवाय परिपूर्ण बॉडी बनवता येत नसल्याचे अनेकांचे मत आहे.
खुराक आवश्यकच
जीममध्ये व्यायाम करताना सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या आहारावर विशेष लक्ष दिले पाहिजे. एखाद्या स्पेशल ट्रेनरकडूनच आहाराबद्दल टिप्स घ्याव्यात. आपल्या जेवणात विशेषत: पालेभाज्या, मोड आलेल्या पदार्थांचे प्रमाण वाढले पाहिजे. तसेच दिवसातून जास्तीत जास्त वेळा पाणी पिणे आवश्यक आहे. जेवण करण्याच्या वेळेत जास्त बदल करू नये. जंक फूड व साखरयुक्त पदार्थ खाणे टाळावे. तसेच प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे, असे जीम ट्रेनर्स दिनेश वागदरे यांचे मत आहे.
काही महत्त्वाचे टिप्स
* पिळदार शरीरासाठी प्रोटीनसोबत व्हिटामिन, मिनरल आणि कार्बोहायड्रेट्स आवश्यक असते. यासाठी फळ, डाळी, मासे, दूध इत्यादी पदार्थ आणि संतुलित आहाराचे सेवन करावे.
* जास्तीत जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील दूषित पदार्थ बाहेर टाकले जातात.
* व्यायाम करताना प्रथम वार्म अप करा. यामुळे बॉडी लवचिक होते. थेट व्यायामाला कधीही सुरुवात करू नका.
* वार्मअपनंतर स्ट्रेचिंग करावे. यामुळे स्नायू व्यायामासाठी सक्रिय होतात. स्ट्रेचिंग करताना स्नायू थोडे ताणावेत.
* पोहणे, सायकल चालवणे, धावणे इत्यादी व्यायामही करावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.