बुल्ली बाई अॅप आणि ट्रेड महासभा; तरुणांचा ब्रेन वॉश करुन केला वापर

Bulli Bai App
Bulli Bai Appटिम ई सकाळ
Updated on

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बुल्ली बाई प्रकरणात (Bulli bai case) रोज नवनविन खुलासे होताना दिसत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुल्ली बाई प्रकरणातील आरोपी हे ट्विटरवरच्या ट्रेड महासभा (Twitter trade mahasabha) या अकाऊंटशी संबंधीत असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात (Police investigation) उघड झाली आहे. ट्रेड महासभा हा हॅशटॅग काही महिन्यांपूर्वी ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत होता. (Youngsters involvement in bulli bai application case linked to trade mahasabha on twiiter)

Bulli Bai App
मृत्यूनंतर तरी नेताजींना त्यांच्या देशात आणा; अनिता बोस यांचे भावनात्मक आवाहन

मुंबई पोलिसांनी नुकतीच अटक केलेल्या निरज सिंग याने मुंबई पोलिसांना या ट्रेंडबद्दल माहीती दिली. आणि बुल्ली बाई प्रकरणाशी संबंधीत असलेले आरोपी हा ट्रेंड ट्विटरवर फॉलो करत होते असेही त्याने सांगितले. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या ओंकारेश्वरनेही त्याच्या चौकशीत दिल्ली पोलिसांना याबद्दल माहीती दिली होती. ओंकारेश्वरने 2020 मध्ये ट्विटरवर असलेल्या ट्रेड महासभा हा ग्रुप जॉइन केला होता. @gangescoin हे त्याचे ट्विटरहँडल होते.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार ट्रेड महासभा च्या माध्यमातून उजव्या विचारांना मानणाऱ्या व्यक्तींना एकत्र करण्यात येत होते. ट्विटरवर या ट्रेंडला सपोर्ट करणाऱे किंवा त्याच्या समर्थनाऱ्थ ट्विट करणाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना चळवळीत समाविष्ट करुन घेण्यात येत होते.

ट्रेड महासभा नक्की काय

ट्रेड महासभा हा ट्विटरवर असलेला एक धार्मिक ग्रुप होता, त्यांनी ट्विटरवर ट्रेडमहासभा हा हॅशटॅग सुरु केला होता, जो काही काळातच ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाला. या हॅशटॅगवर कमेंट करणाऱ्या किंवा लाईक करणाऱ्या व्यक्तींना संपर्क करुन त्यांचे ब्रेन वॉशिंक केले जात होते. भारत हे एक हिंदु राष्ट्र आहे, आणि हिंदू सोडून भारतातील बाकी सगळ्याच धर्माचे लोक बाहेरुन इथे आलेले आहेत, त्यामुळे आपल्याला आपला धर्म वाचवायचा आहे. असं सांगु त्यांना काम करायला सांगण्यात येत असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

Bulli Bai App
मुंबई: चुकीच्या इंजेक्शनमुळं दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू; चार जणांवर गुन्हा

बुल्ली बाई अॅप प्रकरणात अटक करण्यात आलेले विशाल झा, श्वेता सिंग, निरज बिष्णोई, निरज सिंग यांचेही ब्रेन वॉशिंग करुन त्यांना हे काम करयाला संगण्यात आले होते. निरज बिष्णोई आणि निरज सिंग या दोघांनी मिळून हे अॅप बनवलेले असले तरीही त्यामागचे विचार मात्र ट्रेड महासभा चालवणाऱ्यांचे असल्याची माहीती त्याच्या चौकशीत उघड झाली आहे. तसेच सुल्ली डिल अॅप बनवण्यामागेही त्याच व्यक्तीचा हात असल्याचं पोलिस सुत्रांनी सांगितले. त्या व्यक्तीची माहीतीही पोलिसांना मिळाली आहे.

सुल्ली डील अॅपसाठी झाली होती मिटींग

सुल्ली डिलचा मास्टरमाईंड ओंकारेश्वर ठाकुर यांने पोलिसांना दिलेल्या माहीतीनुसार 2020 मध्ये त्याने ट्विटरवर असलेला ट्रेंड महासभा ग्रुप जॉइन केल्यानंतर मुस्लिम महीलांना बदनाम करण्यासाठी एक ऑनलाईन मिटींग झाली, त्यात काय करता येईल यावर चर्चा करण्यात आली, त्यानंतर ओंकारेश्वर ठाकुरने गिटहबवर सुल्ली डिल अॅपसाठी कोड तयार करुन अॅप बनवले होते. सुल्ली डिल संदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याने त्याचे सगळे डिजीटल पुरावे आणि अकाऊंटस नष्ट करुन टाकले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()