मिरा रोड : मिरा रोडमध्ये राहणारा आकाश पाठक गेले 26 दिवस चीनमध्ये एका रूममध्ये बंद असून त्याने मदतीसाठी केंद्र सरकारकडे याचना केली आहे. आकाश पाठक हा गेल्या 10 वर्षांपासून चीनमधील एका विद्यापीठात प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. चीनमध्ये ज्या वुहान शहरात कोरोनाची सर्वाधिक लागण झाली. तेथून जवळच असलेल्या "हेनान प्रोविन्स' या ठिकाणी आकाश सध्या राहत आहे.
महत्वाची बातमी मोबाईल कॉलिंग 25 टक्क्यांनी महागणार
आकाशने पाठविलेल्या व्हिडीओत म्हटले आहे, की मी जिथे राहतो त्याच्या आजुबाजूला दोन हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 60 जण या गंभीर आजाराने मृत्युमुखी पडले आहेत. गेले 7 दिवस झाले या परिसरात एकही माणूस दिसला नाही, आकाश सध्या त्याच्या घरात एकटाच असल्यामुळे भयभीत झाला आहे. दिवसेंदिवस येथील परिस्थिती बिकट होत असल्याचे आकाश यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे.
मोठी बातमी आजपासून तुमचा EMI होणार कमी
आकाश ज्या ठिकाणी राहत आहे, तिथे संपूर्ण वाहतूक बंद करून ठेवली आहे. तेथे अन्न आणि इतर गोष्टींचा पुरवठा होत नसल्याने त्रास होत आहे. तरी आपल्या मायदेशी भारतात परत आणण्याची मागणी त्याने सरकारकडे केली आहे.
Youth of Mira Road confined in China
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.